Ads Area

(Google Ads)

आदिवासींचा डोंगऱ्या देव म्हणजे अंधश्रद्धा !आहे असे म्हणणाऱ्यांना खुलासा.

 ■ प्रश्न- अंधश्रद्धा म्हणजे ?

●अंध+ श्रद्धा= 'अंधश्रद्धा' असे होय.
●अंध= दिसत नाही असा. (अंधळा)
●श्रद्धा= भावना, विश्वास (एखादी गोष्टीस मानतो असा.)
★ मग- आदिवासी डोंगऱ्या देवास मानतो.
ही 'श्रद्धा' आहे.


■डोंगऱ्या देव म्हणजे= डोंगऱ्या देव होय.
● म्हणजेच-ही जगताची संपूर्ण सजीव सृष्टी होय.
●अर्थात- संविधान अनु- ४८ (क)व ५१ (अ/क) त्यात
नमूद असलेले 'पर्यावरणाचे सर्व घटक' होय.
[[ म्हणून डोंगऱ्या देवा मध्ये- ही धरम-धरती,(सृष्टी), आकाश (आबा मंडळ) चंद्र-सूर्य,व आकाशातील गृह-तारे,(सुख-तारा) पहाड-पर्वत,(डोंगर-टेकडी) नदी-नाला;(लवण्या-खवण्या) दरी-खोरी (झिरा-झोरा- पाण्याचाआसरा)वृक्ष,वेली,फुले,फळे, झुडूप,(झाड- कुरपूड), फळ दगड गोटा,लाकडे,हवा, (वायू देवता ) पाणी,अग्नी (विस्तव)(पानदेव))धन,धान्य-अन्न (कणी, कणसरा,भोजन )पशु-पक्षी(जन-जनावरे-नागदेव,वाघदेव,शेळी-मेंढी,बकरी,गाय-म्हैस-बैल (नंदी) गुर,ढोर- पोर, गाय,माय, बाप"] (अर्थात- जनजीवन).....]] इतर अजून खूप काही असतील काही राहिल्यास -
【चुकाय ग्या व्हा! बुलाय ग्या व्हा! माप करी देजा
आदिवासींचे जेष्ठ समाज बांधव!】
कारण- याबद्दल मत व्यक्त करताना काही चुकल्यास
मला समाजाची भिती वाटते.इतरांची नाही.
मग- वरती नमूद केले प्रमाणे हे संविधान अनु-४८(क) व ५१ (क) त्यात नमूद असलेप्रमाणे पर्यावरणाचेच घटक आहेत ना! अजून सगळे खूप काही असतील ते सगळे नमूद करणे अशक्य आहे.
खूप सांगण्यापेक्षा थोडक्यात समजून घ्या. त्याचा अर्थ- वरती सांगितल्याप्रमाणे वास्तव्यात- ही सृष्टी.
हे सगळे घटक आदिवासींच्या डोंगऱ्या देवात सामविले असुन त्यांना आदिवासी जाणतो,मानतो,नामतो.व पूजतो.
कारण- या निसर्गाच्या सहाय्याने मिळणाऱ्या वस्तूचा उपभोग आदिवासीच नव्हे तर; सार्वभौमत्वचा मानव जात करतो.

111
परंतु आदिवासी त्यांचा लाभ मोफत न घेता त्याचा मान-सन्मान, आदर-कदर, होणे करिता आणि त्यांचे उपकार फेडणे करिता मोठ्या भाव श्रद्धा बाळगून डोंगऱ्या देवाला मानतो व पूजा करतो.
मग- जर का कोणी या घटकांना मानत नसतील.
पण- आपले संविधानाचे कलम -४८ (क) व ५१ (क)
च्या तरतुदींना तर मानत असतील ना! ? कि;
त्यांनाही मानत नसणार!?
मग त्यात नमूद असलेप्रमाणेच तर; आहे...
आमचे आदिवासींच्या डोंगऱ्या देवात सगळे! या व्यतिरिक्त दुसरे अजून काय वाटते.
तर मग ही 'श्रद्धा' नाहीतर; कसली अंधश्रद्धा?
मग- कोणाला वरील घटक कसे काय दिसत नाही का!? त्यांचा उपभोग (वापर) त्यांनी घेतलाच नव्हता व घेतच नाही का ! ?
[शहरात राहून कुत्रीम (बनावट) हवा,पाणी व अन्न,
घेणाऱ्यांना काय कळेल पर्यावरणाचे निसर्गाचे महत्व.]
त्या व्यतिरिक्त कळणारच नाही ना; आदिवासींचा
डोंगऱ्या देवाचा अर्थ !
यापलीकडे वरील घटकांचा वापर घेऊनही नकार करत असणार! आणि डोळे असूनही दिसत नसणार ! तर ;
ते वरती नमूद केलेल्या व्याख्या प्रमाणे एकतर आंधळे असतील.नाहीतर ; संविधानाला मानत नसतील.
राहिला आदिवासींचे अंगात वारा (हवा) आलेले चित्र पुढे-पुढे दाखवून 'अंधश्रद्धा' म्हटल्याचा प्रश्न.
● अंगात हवा येणे म्हणजे -अंगात क्षार-काटे येणे, अंग थरकावने.अर्थात- सभ्य भाषेत चेतना येणे.
●चेतना (हवा) वारा येण्याचा श्रोत:-
अगदी सहज आहे कि; एखादया गोष्टीकडे मनापासून खऱ्या भावनेने पाहिले तिचे ध्यान चिंतन व मनन करून त्या बद्दल मनात श्रद्धा बाळगुण विश्वासाने मानले-जाणले पुजले तर; शरीरातील सर्व ज्ञानेंद्रिय जागृत होतात. व होतील. आणि;
त्यामुळे- शरीरात चेतना/ हवा व ऊर्जा (शक्ती/ताकत ) लाभ होते. त्या शक्तीचे प्रहाराने शरीर हालते.थरकावते. व त्यामुळे शरीराला उत्प्रेजन ऊर्जा लाभ होते.व दाखवलेल्या सारख्या (अग्नी,काटे ) अशा गोष्टीचा प्रतिकार करते.
शिवाय- मानवी शरीर हे धरती,आकाश,हवा,ऊर्जा व पाणी या पासून बनले असल्याचे धर्म गुरूंचेही मत आहे ना!. ते म्हणजे 'पंच धातू' होय.
यांनाच आदिवासी पंच महाभूत असे मानतो. व पूजा अर्चना करतो. त्यात गैर काय? फक्त विटंबना "जशी मनी नाही भाव !" आणि देव मला पाव! यात काय अर्थ? कसा पावेल देव!
पण आदिवासीला नक्की पावतो हा देव!
म्हणून तर म्हटले आहे.
"जगतभर आदिवासींची महिमा अपार !
देव तयाचे निराकार!!"
निराकार म्हणजे-ज्याचा आकार नाही असा!
म्हणजेच- आदिवासींचा 'डोंगऱ्या देव' होय.
त्याचे आकार मर्यादित नसून अमर्यादित / निराकार आहे.ज्यात वरील पर्यावरणाचे सर्व घटक सामाविले आहेत.
आणि म्हणून;
जसा- उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असा कालचक्र फिरते.आणि ते बदल घडविण्यास उष्णता,हवा.मदत करते.
म्हणजेच- उष्णतेत हवेचे बाष्पीभवन होऊन ढगात रूपांतर होते.मग पाऊस पडते ना ! का नाही !?
[ संज्ञांचे आधारे भूगोल जाणता ना! त्या पेक्षाही महा तत्व ज्ञानाचा अभ्यास अज्ञान / शिक्षण शिवाय अडाणी असलेला आदिवासीने या डोंगऱ्या देवात करून ठेवला आहे.] शिवाय आता हा विषय सोडतो.
पण- वरील प्रमाणे बदल घडून जेव्हा पाऊस या धरतीवर (अर्थात-सृष्टीवर ) पडतो ना !?
म्हणजे या जगताची काया आईला व त्या पुढील होणाऱ्या प्रक्रियेला आदिवासी माता देव,शेवरी देवांगण्या मानतो.त्यांची पूजा डोंगऱ्या देवात करतो. ती प्रक्रिया पुढील प्रमाणे कि;
काळी आई (धरती) म्हणजे- काळशेवर.
पाऊस पडल्याने हिरवळीला- निळशेवर.
हिरवळीने वाढून गोंडा वरील पिकाला- निळशेवर.
गोंडाईने फुललेल्या पिकाला- फुलशेवर.
फुलातून दुधावरील कणसाचे पिकाला- दुधाशेवर.
त्या कणसांच्या खुडणेची प्रक्रियेला- झेलाशेवर.
या सगळ्यातून धन-धान्य स्वरूपाला- रासशेवर.
अशा वरील ७ शेवरींची पूजा आदिवासी करतो.
येणे वरील प्रमाणेची प्रक्रियेतून धन- धान्य मिळते.तेव्हा जिव-जंतू व माणसाला खायला अन्न मिळते. आणि चिडी मुंगी शेळी-मेडी गाय- वासरू चा वाडा भरते.
त्यामुळे या उपकाराची परत फेड आदिवासी वरती सांगितल्या प्रमाणे करित असतो.
व त्यांना देव अंगण्या मानतो.
देव अंगण्या म्हणजे= आपले अंगण्यातच देव.
अंगण म्हणजे कुठे!?
अर्थात- ही सृष्टीवर जसे वरील प्रमाणे प्रक्रिया होते.
त्याची स्थपणा थुम स्वरूपात आदिवासी आपले अंगणात मांडते. त्यास खळी म्हणते.
खळी म्हणजेच= पृथ्वी.
म्हणून या सृष्टीवरील सार्वभौम धर्मीय माणूस व सृष्टीवरील जीव-जंतू कसा वावरतो / राहतो व व्यवहार करतो.त्यांचा स्वरूप उभे-उभं आदिवासी डोंगऱ्या देवाचे पूजनाचे कालखंडात (सोंग) स्वरूपात करून दाखवतो.
हे वास्तव्य नुसते सोंगच नव्हे तर या पर्यावरणातील सभोवतातील घडणाऱ्या गोष्टींना मान सन्मान व त्या अंगणात आगमन असे होय.
सोंग काढण्या मागील भूमिका आदिवासींची चित्रपट निर्माते व त्या कलाकारां प्रमाणे श्रीमंत होण्याचा स्वार्थ नसतो.
ते तप- तपश्चर्या करून खऱ्या भावनेने पृथ्वीवर होणारा जडण-घडण आहे.ज्याचा साक्षात दर्शन आदिवासींला डोंगऱ्या देव पूजनाचे माध्यमातून होते.
यात काय व्यर्थ! व अंधश्रद्धा सारखे काय? हा बदल आपले डोळे देखत निसर्गात होतो ना!..मग;डोळे असून अंधलेपणा कसला!?
विशेष आदिवासी संदर्भात अधिक म्हटले तर;
आदिवासी म्हणजे-
आदी+वासी= आदिवासी होय.
आदी= पूर्वी,आदी,पुरातन.
वासी= राहणारा,वास्तव्य करणारा
असा 'आदिवासी शब्दाचा' अर्थ होतो.व आहे.
म्हणून म्हणता ना! कि; जन्मतः सर्व प्रथम आईचे दर्शन होते.हे मत सर्वभौमत्वाचे आहे.आणि म्हणूनच;
जेव्हापासून-धरती-आकाश, सूर्य,चंद्र, गृह-तारे,हवा,पाणी ऊर्जा अर्थात-या सृष्टीची निर्मिती झाली असेल.तेव्हापासूनची निर्मिती ज्याची असेल;तोच म्हणजे हा आदिवासी असेल.म्हणून तर म्हटले आहे आदिवासी.
तथापि सृष्टीवर जिवाची निर्मिती होताच प्रथमतः या धरतीचे (पृथ्वी) दर्शन झाले.जिच्यावर या जिवाची निर्मिती झाली.त्यामुळे आदिवासी या धरतीला आपली माय(आई) मानतो.व आबा मंडळाला (आकाश) पिता मानतो.
त्या जिवाची प्रगतीच्या हालचाली नुसार कालांतराने वरील नमूद असलेले पर्यावरण घटकांचे उपभोग घेतले.व जीवनाचे उदरनिर्वाह केले.त्यामुळे त्यांना देव मानतो.व पूजतो.
ही कल्पना नाही.जागतिक पातळीवर आपले डोळ्यादेखत उन्हाळा, पावसाळा,हिवाळा या कला कला चक्रानुसार पर्यावरण सृष्टीवर होणारा बदल आहे. ही वस्तुस्थिती आहे. अंधश्रद्धा नाही.
म्हणून म्हणतात- सगळ्या देवांपेक्षा आदिवासींचा डोंगऱ्या देव मोठा आहे.असे मानले जाते. व त्याचे नाव सरकार-दरबारी सगळीकडे जगतभर आहे.
तरी कृपया अंधश्रद्धा सोडा! डोंगऱ्या देवाला माना व पूजा.जय-आदिवासी! जय-डोंगऱ्या देव!
## खंडू रामलाल गांगुर्डे, (रायतेलकर)
(मो.9022506127)
तात्पर्य:- एकमेव आदिवासी असा आहे कि; जो संविधान अनु-४८(क) चे पर्यावरण घटकांचे संविधान अनु-५१ (क) 'मूलभूत कर्तव्य' चे डोंगऱ्या देव माध्यमाने पार पाडतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad