कोकणी/कोकणा जमातीमध्ये स्त्रीया गळ्यात चांदीची साखळ, हासळी, सोन्याच्या पुतळ्यांचा हार, डोरलं, व रंगबेरंगी मन्यांचे हार, पोवळ्यांचा हार घालतात. दंडात चांदीचा कडा, येल्या, येली, हातात कंकण, नाकात फुली, कानात बाळ्या, पायात पैंजन तसेच सौभाग्याच लेनं गळ्यात मंगळसुत्र, डोरलं, पायात जोडवे वापरतात. पुरूष कानात कुडक्या, मनगटात चांदीचा वाळा, कंबरपट्टा इत्यादी दागीने वापरतात.
Ads Area
(Google Ads)