नागली / नाचणी (कंसरा) |
खालील चित्रात नागलीची पूजा पळसाच्या फुलांनी सजवून भगताच्या साह्याने करून कोंबडा आणि साखरभाताचा नैवद्य दाखवून मग घरी घेऊन जाण्यासाठी तयारीत दिसत आहेत.
टापरा माउली /टापरा नृत्य
या समाजातील डोंगऱ्यादेव उत्सवात टापरा नृत्य केले जाते.पावरकरच्या जोडीला हातातचिरक्या (बांबूची फळी त्यावर खडबडीत केलेले खड्डे करून चिर्र चिर्र असा आवाज येतो.)हातात धरून नाचणारा असतो त्याला टापरा माउली म्हणतात.
या नृत्यात पावरकर आणि टापरा यांच्या जोडीने डफलीच्या आवाजात मोठ्या उत्साहात नृत्य केला जातो.आणि खळीमध्ये विविध वळीत (गाणे)म्हणून एका गोलात टाळ्यांच्या पावरीच्या सुरात नृत्य केले जाते.याला टापरा नृत्य म्हणतात.
वही
वही हा एक वेगळा प्रकार या समाजामध्ये रूढ आहे,लग्न ,नवरात्र,इत्यादी कार्यक्रमात जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. म्हणजे या वेळी 'ढाका' हे ढोलकीसारखे वाद्य वाजवले जाते आणि ढाकांच्या आवाजाच्या सुरात वही हा गाण्याचा प्रकार गाईला जातो.वही ह्या गाण्याद्वारे देवांचे गौरव केले जाते.त्याचप्रमाणे देवांच्या कथाही यामध्ये वर्णिल्या जातात. वही हा गाण्याचा अत्यंत वेगळा प्रकार आहे.
कदाचित हा गाण्याचा प्रकार इतरत्र कुठेही नसावा ?
पाटल्या /विरखांब
आदिवासी कोकणी कोकणा समाजातील पंचमी सण.
आदिवासी कोकणी कोकणा समाजात पंचमीला एक वेगळंपण आहे ते या समाजातील आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत असलेल्या विशिष्ट परंपरेमुळे.अगदी जुन्या काळापासून पिढीजात आणि परंपरागत हा सण कोकणी कोकणा समाजात साजरा केला जातो.या समाजातील लोक मुळातच निसर्ग पूजक असल्याने पंचमीला विशेष महत्त्व आहे.या भिंतीवर विविध प्राण्यांचा चित्रांची पूजा केली जाते . या दिवशी चुलीच्या जवळील भिंतीवर शेणाने सारवून विविध चित्रांचा आराखडा रेखाटला जातो या मध्ये गाय, बैल,नाग,वाघ,सिंह,औत, मानवी साखळी,झाडे,घर,चंद्र सूर्य, चाक विविध आयुध इत्यादी चित्रांचे रेखाटन केले जाते.खरं म्हणजे संपूर्ण समाज निसर्ग,प्राणी पूजक असल्याचे हे द्योतकच आहे.चित्रे काढणे एवढंच या दिवसाचं महत्व नसून, यात संपूर्ण चित्ररूपी निसर्ग देवतांचे पूजन देखील या दिवशी केले जाते.चित्र काढताना जुन्या काळात नैसर्गिक पांढरा रंग तयार करून वापरला जाई परंतु सध्या बाजारात चुना सहज उपलब्ध होत असल्याने चुन्याचा वापर चित्र काढण्यासाठी होत असल्याचे अलीकडे दिसून येते.कोकणी कोकणा समाजात अशा अनेक निसर्ग पूजनीय प्रथा आढळून येतात त्यापैकीच हि एक होय.सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून देवतेची पूजा केली जाते.अलीकडे बरीच मंडळी प्रत्यक्ष वारूळ जवळ नारळ अगरबत्ती लावून पूजा अर्चा करतात. व दुध खीर चढवतात किंवा दुधाची वाटी वारुळाजवळ ठेवतात.कोकणी कोकणा समाजात प्रत्येकाच्या घरात या दिवशी गोड-धोड पदार्थ(कान्होळे) बनवले जातात.यानंतर संध्याकाळी घरात चुलीजवळ भिंतीवर शेणाने सारवून त्यावर पांढऱ्या रंगाने किंवा चुन्याने चित्र काढलेल्या ठिकाणी धान्य पाणी वगैरे ठेऊन भिंतीवर काढलेल्या विविध चित्राची पूजा करतात, आणि त्यानंतर गोड गोड जेवण तयार करून पंचमीला नैवद्य दाखवितात.
भिंतीवरील हे पंचमीची चित्र म्हणजे चित्रकला शास्राचा एक अद्भुत नमुना होय.अर्थात वारली आणि कोकणी समाजातील पेंटिंगचे नमुने यात दिसून येतात. कोकणी कोकणा समाज देखील चित्रकलेला पिढयानपिढया जोपासत आलेला आहे . म्हणजेच वारली चित्रकला हि कोकणी कोकणी समाजात देखील परंपरागत रूढ होती हे या ठिकाणी सिद्ध होते.त्याचप्रमाणे हा समाज देखील चित्रकलेचा उपभोक्ता होता किंवा कलाप्रिय होता असे यावरून दिसून येते.अशाप्रकारे आजही पिढीजात परंपरा पालन करीत कोकणी कोकणा समाजात पंचमी साजरी केली जाते.
- कंसऱ्या गड -शबरीधाम डांग जिल्हा गुजरात हे देवस्थान गुजरात राज्यातीळ अहवा डांग जिल्यात असून पिंपळनेर -सुबीर नवापूर रोडावर शेंदऱ्याआंबा या गावापासून सुमारे ३-४ किमी अंतरावर अत्यंत घनदाट जंगलात कंसऱ्या गड वसलेले आहे.जवळच शबरीधाम हे प्रसिद्ध देवस्थान देखील आहे. त्याचप्रमाणे पम्पा सरोवर येथे देखील विलोभनीय धबधबा पाहण्यास मिळतो. जमिनीपासून सुमारे ५०-१०० फूट उंचीवर हे डोंगर आहे या डोंगरावर थोड्या उतार भागातच श्री कंसऱ्या गडाचे स्थान आहे. अत्यन्त रमणीय आणि देखण्या अशा घनदाट झाडीत एका छोट्याशा नाल्याच्या काठावरच कंसऱ्या देवाचे कपार लागते.थोड्या निमुळत्या आणि चिंचोळ्या होत जाणाऱ्या कपारीत अथांग दूरवर देवलोकात जाणारी वाट असावी असा भास होत भाविकांच्या मनात सहजच येईल अशा विलोभनीय स्थानी श्री कंसऱ्या गड वसलेला आहे.येथील पिण्याचे पाणी अत्यंत गोड असून जणू काय ताजे नारळाचे पाणीच आहे असा भास पाणी पिताना झाल्याशिवाय राहत नाही .येथील गगनचुंबी झाडे अस्मानाला गवसणी घालत आहेत.तर मधेच गडाच्या पायथ्याशी वाहत जाणारा झरा भाविकांचे लक्ष वेधल्या शिवाय राहत नाही.अत्यंत पवित्र आणि नवसाला हमखास पावणारा अशी ह्या देवस्थानाची ख्याती आहे आणि म्हणूनच येथे दरवर्षी लाखो समाजबांधव दर्शनासाठी येत असतात. याठीकांणाची नैसर्गिकता जाऊ नये म्हणून येथील स्थानिक नागरिक याठिकाणी कोणत्याही प्रकारचे मंदिर वगैरे बांधण्यास मज्जाव करतात. गडाच्या दारापाशी थोड्याफार काँक्रीटने भाविकांना बसण्यासाठी सपाट जागा करण्यात अली आहे.तर भाविकांना नाचगानी ,आणि मुकामी राहण्यासाठी गडाच्या पायथ्याशी देवखळ्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या खळ्यामध्ये भाविक रात्री नाचगाणी आणि कन्सर्या गडाची आराधना करीत असतात.
- शेंदवड गड -शेंदवड ता.साक्री जि.धुळे हे देवस्थान साक्री तालुक्यातील शेंदवड या गावच्या पश्चिम दिशेला असून अत्यंत खडतर आणि जमिनीपासून खूप उंच अशा ठिकाणी हे स्थान आहे. सगळ्यात उंच शिखरावर शेंदवड भवानी मातेचे सुंदर असे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाण्याची वाट अत्यंत बिकट असून येथपर्यंत पोहचण्यास मोठी हिम्मत लागते.गडाच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी मोठा रास्ता आहे. त्यामुळे पायथ्यापर्यंत गाडीने जाता सहज येते. गडावर जाण्यासाठी/चढण्यासाठी मात्र पायीच जावे लागते . गडाच्या पूर्वेला शिखराजवळच डोंगऱ्या देवाचे स्थान असून याठिकाणी देखील दरवर्षी खूप मोठ्या संख्येने समाजबांधव,आणि इतर भाविक मंडळी येत असतात.या भागाला अलीकडेच महाराष्ट्र शासनाने पर्यटन क्षेत्र घोषित केलेले आहे.
- कोल्याटा गड -बर्डीपाडा ता.साक्री जि.धुळे साक्री तालुक्यातील बर्डीपाडा या गावाजवळ गावाच्या ईशान्य दिशेला कोलाट्या गडाचे स्थान आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील कोंडाईबारी गावापासून ३किमी अंतरावर बर्डीपाडा गाव आहे. येतुन ३ किमीअंतरावर भरडू (मालनगाव) डॅम आहे या धरणापासून उत्तरेकडे कोलाटयागड आहे. गडाच्या पायथ्याशीच असलेल्या मालनगाव डॅम पाण्याने अत्यंत तुडुंब भरलेला असल्याने गडावरून अत्यंत नयनरम्य दृश्य पाहावयास मिळते. कोलाट्या गड जमिनीपासून सुमारे ५००मी उंचीवर असून गडाच्या शिखराला खूप मोठी गुहा/बोगदा असून ह्याच गुहेत डोंगऱ्यादेवाचे स्थान आहे . या गुहेमध्ये/बोगद्यामध्ये वाकून वाकून भाविक (माऊल्या )दर्शनासाठी आत जात असतात.या गुहेतून वर उंच शिखरापर्यंत जाता येते. असे म्हटले जाते कि,जसजसे या उत्सवात पौर्णिमा जवळ येत जाते तसतसे या बोगद्याची रुंदी विस्तारत जाते आणि भाविकांना सहजच दर्शन घेता येते .आणि म्हणूनच या गडावर भक्त अत्यन्त निस्सीम श्रद्धेने येत असतात. परंतु या दिवसात येथे येण्यासाठी विशिष्ट असे व्रताचे पालन करावे लागते. असे म्हणतात कि जे भाविक नियमांचे पालन न करता या ठिकाणी येतील त्याना काहीतरी शिक्षा होते. आणि तो या गडाचे दर्शन करू शकत नाही .त्याला असेच परतावे लागते. परंतु जो नीट नियमांचे पालन करून जातो त्यास मात्र दर्शनास कोणताही अडथळा येत नाही गडाच्या शिखरावरून आजूबाजूची जवळपास २०-२५ गावे सहजच नजरेस पडतात. याठिकाणी दरवर्षी भरपूर समाजबांधव या कार्तिक महिन्यात दर्शनासाठी येत असतात.
- धाऱ्याबाऱ्या गड -बासर ता.साक्री जि.धुळे
- झळका गड-झळके ता.नंदुरबार
- बगळ्या गड-जामखेल ता.साक्री जि.धुळे
- असलपेढा -टेंभा बागुलपाडा ता.साक्री जि.धुळे साक्री तालुक्यातील पिंपळनेर रोहोड रस्त्यावर टेंभे गावाजवळ/बागुलपाडा असलपेढा हे डोंगर्यादेवाचे स्थानक आहे.सदर गडाची उंची सुमारे ५० मीटर असावी.फारसे उंचीवर नसलेल्या या गडाला कोकणी कोकणा समाजात फार महत्व आहे.उंच शिखरा जवळ साधारणपणे पूर्व दिशेला डोंगर्यादेवाचे स्थान आहे. संपूर्ण शिखर अखंड खडकाचे बनलेले आहे.याच खडकात एक अखंड कपार आहे.आणि याच कपारीत डोंगर्यादेवाचे पूजन केले जाते.हि कपार अत्यंत अथांग असून जणू काय स्वर्ग लोकात जाण्याचा मार्गच असावा असा भाव मनात आल्याशिवाय राहत नाही.असे म्हटले जाते की जसजसे कार्तिक महिना जवळ येतो तसतसे या गडाचा दरवाजा म्हणजे प्रवेशद्वार रुंदावत जातो व पोर्णिमा संपली की तो लहान-लहान होत जातो. दरवर्षी कार्तिक महिन्यात याठिकाणी खूप मोठ्या संख्येने भाविक नवस पूर्तीसाठी येत असतात.गडाच्या पायथ्याशी भाविकांना मुकाम करण्यासाठी आणि नाचगाण्यासाठी खळ्या तयार केलेल्या आहेत.या खळ्यामध्ये जाण्यास अत्यंत कडक नियम लागतात.म्हणजे मांसाहार आणि मद्यपान संपूर्ण वर्ज्य असतो.किवा निसीद्ध मानले जाते.गडाच्या शिखरावरून आजुबाजीची गावे सहज नजरेस पडत असल्याने वरती गेल्यावर एक वेगळा आनंद,निसर्ग सौंदर्य पहावयास मिळतो.एकदा व्यक्ती गेल्यावर पुन्हा-पुन्हा जावेसे असे नक्कीच वाटते.अत्यंत सुंदर असे हे देवस्थान आहे.
- निवळी/निवळा -करण्झटी ता.साक्री जि.धुळे
- मांडव गड नवापाडा ता.साक्री जि.धुळे
- आजीपाळगड वडपाडा ता.साक्री जि.धुळे
- चिचल्यागड बंधारपाडा ता.नंदुरबार जि.नंदुरबार
- भिवसनगड मावजीपाडा ता.साक्री जि.धुळे
- मोगरा गड पाचमौली ता.साक्री जि.धुळे
- शेवगागड पचाळे ता.साक्री जि.धुळे
- पातळ गड वाल्हवे ता.साक्री जि.धुळे
- नारळ गड पांगण ता.साक्री जि.धुळे
- भुयर गड विरखेल ता.साक्री जि.धुळे
- खारकी गड विरखेल ता.साक्री जि.धुळे
- धनाई पुनाई झिरणीपाडा ता.साक्री जि.धुळे
- कुवर्ली गड शिरपूर ता.नंदुरबार जि.नंदुरबार
- झळकागड झळका निंबी ता.नंदुरबार जि.नंदुरबार
- बगला गड ढेकवद ता.नंदुरबार जि.नंदुरबार
- धवळबारी गड शिर्वे ता.नंदुरबार जि.नंदुरबार
- पावा गड मानुर पेठ नाशिक जि.नाशिक
- धवळ्या गड मांगी तुंगी ता.सटाणा जि.नाशिक.
- तवली डोंगर गड सुरगाणा रोड ता.सुरगाणा जि.नाशिक
- पखाल्या गड ढवळीविहीर ता.साक्री जि.धुळेफखाल्या गड हा जमिनीच्या आत तळघरात आहे. गडाच्या पायथ्याशी धरण तुडुंब वाहत आहे दक्षिणेकडे सुमारे 50फूट एवढया उंचीचे सुंदर डोंगर आहे पाउस वारा वादळ नैसर्गिक आपतीमध्ये देखील याठिकाणी सुमारे 300 माउलीचे संरक्षण होईल अशी सोय आहे .डोंग-यादेव सनाव्यतिरिक्त इतर दिवशी देखील सेवा करणारे भाविक सेव-या माउली इथे देवाची सेवा करत असतात .गावपासून सुमारे एक किलोमीटर गडाचे अंतर आहे गडाला सेवा करणारे सेवक दहा वर्षापासून गडाच्या अवतीभवती झाडे लावत असल्याने अत्यंत नैसर्गिक आणि थंड असे वातावरण असते .
- तिखळ्या गड जमाझिरे ता.साक्री जि.धुळे साक्री तालुक्यातील दहिवेल-राईनपाडा रस्त्यावर जामझिरे हे गाव आहे .गावाच्या अगदी दक्षिणेकडील बाजूस तिखल्या डोंगर आहे .हे डोंगर पावसाळ्यात अत्यंत विलोभनीय दिसते.मात्र पावसाला संपल्यावर झाडे नसल्याने डोंगर काहीसा मोकळा मोकळा दिसतो.डोंगराचा आकार अत्यंत सुंदर आणि देखणा असल्याने रस्त्याने जाताना एक नजर डोंगराकडे गेल्याशिवाय राहत नाही.हे डोंगर सुमारे ५०० मी उंचीचे असून याच डोंगराच्या शिखरावर साधारणपणे पश्चिम बाजूला डोंगऱ्या देवाचे स्थान आहे. या स्थानाला आदिवासी कोकणी कोकणा समाजात अत्यंत महत्वाचे असे स्थान आहे.या ठिकाणी देखील दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये भरपूर मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आणि नवसपूर्तीसाठी येत असतात.नवसाला हमखास पावणारा अशी या देवस्थानाची ख्याती आहे.
- रतनगड
- रेशम्या गड भिलदर ता.सटाणा जि.नाशिक
- गंभीरगड
- भोवऱ्या /पायऱ्या गड शेवरे ता.सटाणा जी नाशिक
- साग्यागड
- कांडुळया.
- गारया.
- शिळांदरया.
- गायकवाडया.
- मोरया.
- वाघ्या.
- धनसरा गड आमळी ता.साक्री जि.धुळे श्री क्षेत्र कन्हैयालाल महाराज मंदिर आमळी ता.साक्री जि.धुळे पासून उत्तरेला एक उंच डोंगर दिसतो या डोंगराच्या उंच शिखरावरच डोंगऱ्या देवाचे स्थान असून आमळी गावापासून सहज नजरेला पडेल अशा ठिकाणी धनसरा गड आहे.आसपासच्या गावांतील समाज बांधवाचे खास श्रद्धास्थान असलेले हे देवस्थान आहे.धनसरा गडाची उंची सुमारे १०० मी एवढी असावी.गडाला २-३ फुटाची कपार असलेल्या ठिकाणी डोंगर्यादेवाचे स्थान आहे.या डोंगरावर अन्य देवांचे आणि गुप्त धनाचे देखील स्थान आहे असे मानले जाते हे धन काही वेळा झगमग करत असताना बऱ्याच लोकांच्या नजरेस पडते असे या ठिकाणचे काही जेष्ठ व जाणकार लोकं सांगतात.या ठिकाणी देखील अत्यंत सुंदर असे वातावरण आणि डोंगरातील शुध्द हवा,कन्हैयालाल महाराजांचे टुमदार मंदिर, आजूबाजूला असलेले विलोभनीय दृश्य पाहून डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही. गडाच्या उतरेकडे जंगल असून या गडाच्या शिखरावरून घनदाट जंगल पाहण्यास खूप आनंद घेता येतो.दरवर्षी कार्तिक आणि आश्विन महिन्यात या ठिकाणी भाविक जमत असतात.
- साठीवाटी गड तोरणकुडी .साक्री जि. धुळे
- रेशम्या/भुयार गड गैंदाना डोंगर देवदरा नवेनगर साक्री जि. धुळे
- पायरया गड देवदरा नवेनगर पो.जेबापुर ता साक्री जि.धुळे.
- मुरंबी गड शिवपाडा ता.दिंडोरी जि.नाशिक
- मधळ्या गड पारगांव ता साक्री जि.धुळे.
- भीवसन गड राईनपाडा ता.साक्री जि.धुळे.
- धवल्या व कुवाऱ्या गड गोळवाड ता.सटाणा जि.नाशिक
- नि-हळ (निलंगा)डोंगर ता.कळवण जि नाशिक . दळवटपंचक्रोसीतील गड-निलंगागड दरेगाव(हा़) ता.कळवण.परिसरातील राजागड येथे राजमावली देवकन्सरा स्थायीक झाली असे मानले जाते. रायकनड नि-हळ डोंगर येथे निळप(निलंगादेवी) हिने तिचा पती टाफरा याला पकडले. टाफरा हा मांडव, शेंदवड गड,इत्यादीगड खोदत खोदत धुळे नंदुरबार भागातून कळवण भागात रायकनगड येथे आला. त्याला शोधत शोधत निळप या डोंगरावर आली व तेथे तिला टाफरा सापडला. म्हणून या डोंगराला नि-हळ(निलंगा देवीचा डोंगर म्हणतात.
- भोऊरकडा ठाणापाडा ता.सुरगाणा.,जि.नाशिक
- कोल्हाळ्यागड जिरवाडा.ता.कळवण,जि.नाशिक
- भोराईगड(तिरंम्यागड) भाडणे(हा) ता.कळवण.गाग-यागड,
- शिनगा-यागड शिंगासी ता.कळवण. राजागड दळवट ता.कळवण.
- पाडशाडोंगर पाय-यागड करंभेळ,भाकुर्डेता.कळवण.
- गायदांडगड कोसुर्डे ता.कळवण.जि.नाशिक
- धुळखाकरगड आमदर ता.कळवण, जि.नाशिक
- रायकनगड जामले(हा.)ता.कळवण ,जि.नाशिक
- पाय-यागड गायदरपाडा ता.सुरगाणा. जि.नाशिक
- हातगड ता.सुरगाणा जि.नाशिक
- दुधल्यागड घोगलगाव (आष्टे) ता.जि.नंदुरबार
-
सदर यादीत तुम्हाला माहित असलेल्या गडांची नावे add करायची राहिली असल्यास कृपया माझ्या (अशोक थविल) ९४०३३०६११७ या whatsapp नंबरवर पाठवा. वरील यादी facebook च्या माध्यमातून जमा केलेली असल्याने सत्यता सांगता येणार नाही याची नोंद घ्यावी.