Ads Area

(Google Ads)

खाद्यसंस्कृती

खाद्यसंस्कृती



पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये पानं, फळं, फुलं, कंद अशा एक ना अनेक स्वरूपातल्या रानमेव्याने जंगल बहरलेलं असतं. त्यातून शेकडो प्रकारच्या रेसिपीज तयार करण्याचं कौशल्य आदिवासींनाकोकणी कोकणी कोकणा समाजाच्या लोकांना  अवगत असतं. या भाज्यांमध्ये प्रामुख्याने रानकेळी, रानभेंडी, हादगा, सफेद मुसळी, धांदडा, जास्वंद, गिलके, दोडके, चवळीची फुलं, खडीकंद, आळू, बांबूचे कोंब, माटला, टोळंबी, गोयची, कुई, हुळूशाचा मोहोर, देव्हारी, गिलोडा, बाफळी, भेंडी, कर्टूले, गधडलिंबू, टेहरा, नाघोटी, पाथोरबी, पपई, नळबूथ, चहूल गोंडास, कांचनफुल, डोंबळीची भाजी, गोंडास, टेराभाजी यांचा समावेश आहे. अशा ५० ते ६० रानभाज्या परिसरात उगवत असतात. आदिवासी समाजात मसाल्यांचा वापर फार कमी करतात. कांदे-लसूण, तेल, तिखट आणि मीठ हीच त्यांची प्रमुख पाकसामुग्री असते. काही भाज्या तेलात परतून, तर काही फोडणी देऊन तयार केल्या जातात. काही वाफेवर शिजवल्या जातात; तर काहींना पाण्यात उकळून शिजवलं जातं. काही भाज्या तर दुधातही उकळून बनवल्या जातात.  आदिवासी कोकणी कोकणा समाजात नागली आणि तांदूळही पिकवतात. त्यामुळे या भाज्या तांदळाच्या किंवा नागलीच्या भाकरीसोबत खाल्ल्या जातात.


 
 

  

जाणून घेऊया काही रानभाज्यांचे महत्त्व
टाकळा  
- ही भाजी साधारणतः पावसाळ्यात अधिक उपलब्ध असते.  ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात
- टाकळाला सुगंध उग्र असला तरी कोवळ्या पानांची भाजी रुचकर लागते 
- ही भाजी सर्व प्रकारच्या त्वचा रोगावर उत्तम औषध आहे, टाकळ्याच्या बिया वाटून त्याचा लेप त्वचेवरही लावला जातो.
- तसंच ही भाजी उष्ण असल्याने शरीरातील वात व कफ कमी होण्यास मदत होते
आंबुशी 
- आंबुशी राज्यात सर्व आढळते 
- आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असून भूक वाढीसाठी उपयुक्त आहे 
- तसेच कफ, वात आणि मूळव्याध यात आंबुशी गुणकारी आहे
मायाळू  
- मायाळू ही बहुवर्षायू वेल असून या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात
- मायाळूचे वेल कोकणात सर्वाधिक प्रमाणात आढळतात  
- मायाळूची कोवळी पाने भाजीसाठी वापरतात 
- रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी गुणकारी आहे 
- गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची आहे
- मायाळूची भाजी पालकाप्रमाणे पचण्यास हलकी आहे.
करटोली 
- करटोलीची वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट व पश्‍चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात
- करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात
- करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखीच असून पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात उपलब्ध होते
- करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते
कपाळफोडी 
- कपाळफोडी या वनस्पतीची वेल राज्यात वनात, शेत आणि ग्रामीण भागात आढळते
- सांधांना सुज आल्यास पाण्यात किंवा दुधात ही वनस्पती वाटून त्याचा लेप करावा व तो लाववा. यामुळे वेदना कमी होतात व सूजदेखील उतरते.
- कानाच्या दुखण्यावरही  ही वनस्पती गुणकारी आहे 
शेवळा 
- शेवळा ही वर्षायू, कंदवर्गीय वनस्पती आहे
- महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते
- शेवळ्याचा कंद औषधात वापरतात
- शेवळ्याचे कंद व कोवळी पाने भाजीसाठी वापरतात.
मोरशेंड 
- ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती पावसाळ्यात सर्वत्र आढळते
- मोरशेंड वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात
- या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील अॅसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते
नळीची भाजी 
- नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते.
- नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते. तसेच कावीळ, श्‍वासनलिका दाह व यकृत विकारासाठी या वनस्पतीचा वापर करतात
आघाडा 
- आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते.
- प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशात ही वनस्पती आढळते 
- या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे (पंचांग) औषधात वापरतात
- अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत
- जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो तर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते.
- रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात.
भुईआवळी 
- भुईआवळी ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून 20 ते 50 सें.मी.पर्यंत उंच वाढते. 
- भुईआवळी ही वनस्पती  एरंडाच्या कुळातील आहे 
- याची पाने, कोवळी खोडे व फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात
- थंडीताप, सर्दी-खोकला या आजारांवर ही भाजी गुणकारी आहे
 
 
 
 
 
 







टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
  1. खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली, गडचिरोली,गोंदिया जिल्यात देखील आदिवासी जमाती आहेत. गोंड जमातीचा देखील समावेश करावा.

    उत्तर द्याहटवा
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.