Ads Area

(Google Ads)

About Us

                           

         
आदिवासी कोकणी कोकणा समाजाची संस्कृती अतिशय आगळी वेगळी आहे हे आपण जाणून आहोत मात्र या आगळ्या वेगळ्या संस्कृतीची जोपासना करणे अतिशय आवश्यक आहे.आज पाश्चिमात्य संस्कृती आणि शहरीकरण यामुळे आदिवासी कोकणी कोकणा समाजात देखील अनेक बदल झालेले पाहवयास मिळतात.परंतु आदिम संस्कृती ची जोपासना करणे हे समाजबांधव म्हणून आपली जबाबदारी आहे कारण या समाजाची संस्कृती केवळ मौखिक स्वरूपाची आहे. लेखी स्वरूपाची संस्कृती विषयक पुरावे खूप कमी प्रमाणत आढळतात.आणि म्हणून
आम्ही या ठिकाणी आदिवासी कोकणी कोकणा आणि कुकणा समाजाच्या चालीरीती, रुढी-परंपरा बद्दल माहिती संग्रहित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.यामधे कोकणी कोकणा समाजात होणारे 
1)लग्न समारंभ
2)साखरपुडा, 
3)विविध सण उत्सव
4)जन्म मृत्यू संस्कार प्रसंग
5)दैनंदिन जीवन 
6)धार्मिक व सामाजिक इतिहास
7)व्यवसाय
8)देवदैवते
9)पोशाख 
10) आभूषणे
    इत्यादी बाबतीत माहिती संकलन करून ती लेखी स्वरूपात जतन करून सर्वासाठी खुली करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत.कदाचित यात फक्त काही भागाच्या संस्कृतीविषयी माहिती तंतोतंत लागू असेल मात्र प्रातिनिधिक स्वरूपात माहिती या ठिकाणी उपलब्ध असेल.कारण भाषा जशी मैलोमैल बदलत जाते तशी दैनंदिन जीवन, राहणीमान, पोशाख, समारंभ यात देखील थोड्याफार प्रमाणात बदल असू शकतो.आपण ज्या ज्या भागात राहतो त्या त्या ठिकाणची संस्कृती भाषा यांचा पगडा त्या ठिकाणी दिसून येत असतो.शिवाय नोकरी व्यवसाानिमित्त स्थलांतर झाल्याने बऱ्याच वेळा आपली संस्कृती सोडून तेथील परसरतील संस्कृती आत्मसात करावी लागते .यामुळे आजकाल आदिवासी कोकणी कोकणा समाजात खुप सारे बदल झालेले पाहवयास मिळतात.परंतु आजही पाड्यात आपली संस्कृती जशीच्या तशी पाहवयास मिळते आणि म्हणून आपल्या संस्कृतीचे जतन करणे खूप महत्वाचे आहे.याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आदिवासी कोकणी कोकणा समाज विषयी माहिती जतन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.


                आपलाच
kokanikokana.blogspot.com    

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.