Ads Area

(Google Ads)

पोशाख

                                                     माहिती update करणे सुरु आहे 

                                                      कोकणी समाजाचा पोशाख 

                                                                                     

            
       आदिवासी कोकणी समाजाचाच्या  पोशाखात  'फडकीचा 'वापर प्रामुख्याने वापर
होताना दिसतो.याशिवाय पोलका आणि सहावारी साडीचा अर्धा तुकडा करून कोकणी स्रिया  कमरेभोवती नेसत असतात.त्यास ला लुगड अस म्हणतात.तसेच गळ्यात विविध आभूषणे ,दागिने परीधान करायची कोकणी स्रियांना खूप  हौस असते.खासकरून चांदीचे दागिने अधिक प्रमाणात वापरली जातात.हातातीळ दंडात येल्या घालण्याची प्रथा समाजात प्रचलित आहे. याशिवाय गळ्यात चांदीच्या साखळ्या आणि सोन्याचं अथवा साधे डोरलं घालतात. त्यास गोर्सळ असे म्हणतात. याच्या मध्येभागी मोठी वाटी बाजूला काळ्या मण्यांमध्ये थोडेफार सोन्याचे मणी असे मंगळसूत्र असते.


स्त्रीया लाल रंगाची व
त्यावरकाळ्या व पांढ-
या रंगाच्या ठिबक्यांची
"फडकी" (ओढणी), चोळी,
खांडवा (नऊवारी लुगडा) तर पुरूषांचा पेहराव डोक्याला
'पागोटा'
किंवा 'टोपी' अंगात बंडी, कंबरेला 'धोतर' असा
असतो.
प्रदेशानुसार स्त्रीयांची
ओढणीत थोडे बदल आढळतात.

kokanikokana.blogspot.com

kokanikokana.blogspot.com




वरील चित्रात स्रियांच्या दंडात चांदीच्या यल्या घातलेल्या दिसून येतील साधारणपणे एक्का दंडात  २५० ग्रॅम आणि दुसऱ्या दंडात २५० ग्रॅम वजनाच्या अशा या येल्या असतात. 
कोकणी/कोकणा जमातीमध्ये
स्त्रीया गळ्यात चांदीची साखळ,हासळी, सोन्याच्या पुतळ्यांचा हार, डोरलं, वरंगबेरंगी मन्यांचे हार, पोवळ्यांचा हार घालतात. दंडात चांदीचा कडा, येल्या,येली,हातात कंकण, नाकात फुली, कानात बाळ्या, पायात पैंजन
तसेचसौभाग्याच लेनं गळ्यात मंगळसुत्र, डोरलं, पायात जोडवे वापरतात. पुरूष कानात कुडक्या, मनगटात चांदीचा वाळा,कंबरपट्टा इत्यादी दागीने वापरतात.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या