Ads Area

(Google Ads)

ओळख

                               माहिती update करणे सुरु आहे 


ओळख - "कोकणी/कोकणा" ही एक आदिवासी जमात आहे. ही जमात भारताच्या महाराष्ट्र राज्यात नंदुरबार, धुळे, नाशिक व ठाणे जिल्ह्यात व गुजरात राज्याच्या सुरत व तापी जिल्ह्यात राहते. नंदुरबार व धुळे व गुजरात मध्ये 'कोकणी' असे संबोधले जाते नाशिक व ठाणे जिल्ह्यात 'कोकणा' असे संबोधतात. वस्ती व निवास व्यवस्था ही मुख्यत्वे करून डोंगरपठार, नदीनाला जवळ आढळून येते.
 कोकणी/ कोकणा जमातीचा पुर्वीपार स्वतंत्र अस्तित्व असून कोणत्याही इतर
जमातीची उपजमात नाही. व कोकणी/कोकणा जमातीची कोणतीही उपजमात नाही. कोकणी/कोकणा जमातीचा मुख्य व्यवसाय 'शेती' असून 'उत्तम'
प्रकारे शेती करतात. जोड व्यवसाय म्हणून पशुपालन (गायी, म्हैशी, बक-या), कुकूटपालन काही जण
सुतारकाम सुध्दा करतात. तसेच जंगलात महुफुले, टोळमी गोळा करणे इत्यादी कामे करतात.



कोकणी/कोकणा जमातीचा पेहराव स्त्रीया लाल रंगाची व त्यावर काळ्या व पांढ-या रंगाच्या ठिबक्यांची"फडकी" (ओढणी), चोळी,खांडवा (नऊवारी लुगडा) तर पुरूषांचा पेहराव डोक्याला
'पागोटा'किंवा 'टोपी' अंगात बंडी, कंबरेला 'धोतर' असा असतो. प्रदेशानुसार स्त्रीयांची ओढणीत थोडे बदल आढळतात. ही जमात सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशील
राहणारी होती कालांतराणे दुष्काळामुळे अन्नाच्या शोधात स्थलांतरीत झालेली आढळते. ह्या जमातीचा इतिहासात 'मावळे' म्हणून उल्लेख आढळतो. (मावळे काटक व माळराणावर राहणारे
हातावर भाकर, ठेचा घेऊन खानारे) आज देखील ह्या जमातीकडे तलवार, भाला, ढाल आदी साहित्य आढळून येतात. कोकणा/ कोकणी जमातीतील लोक काटक, शेतात काम करतांना हातावर भाकर घेऊन खातात  कोकणी/कोकणा जमातीची 'कोकणी' ही भाषा आहे. नंदुरबार जिल्ह्यात 'बुंधाडी', धुळे जिल्ह्यात 'घाटली' (घाटावरील) तर डांग भागात 'डांगी' (गुजराती भाषेचा प्रभाव आहे) नाशिक व ठाणे जिल्ह्यात 'कोकणा' (मराठी भाषेतील काही शब्द) बोलली जाते. प्रदेशानुसार भाषा बदलत जाते. कोकणी भाषेत मराठी, हिंदी, गुजराथी भाषे मधील काही शब्द वापरले जातात. बऱ्याच अंशी या भाषांचा त्या त्या भागात कोकणी भाषेवर प्रभाव दिसून येतो. कोकणी/कोकणा जमातीचे मुख्य सण
पंचमी, पोळा, सर्वपित्री, दिवाळी, दसरा, उतराण, होळी, आखात्री, खांब/पाटली पुजन,
घाटा, शिवा-या, वाघदेव व डोंग-यादेव, घट्यादेव हे उत्सव आनंदाने साजरे करतात. तसेच विवाह, पाचवा, जाऊळ, उत्तरकार्य इत्यादी सोपस्कर पारपाडले जातात. कोकणी/कोकणा जमातीमध्ये 'एक
पत्नीत्व' समाज व्यवस्था तसेच विधवा विवाह समाजाला मान्य असून
'एकत्रीत' व 'विभक्त' कुटूंब पध्दीत असे दोन्ही व्यवस्था आहेत. एकाच
कुळात लग्न करीत नाही किंवा इतर समाजात व जमाती मध्ये
देखील करत नाही. ह्या जमाती मध्ये ५० च्या आसपास कुळ/ आडनावे आहेत. कोकणी/कोकणा जमातीमध्ये कणी-कंसरा,  वाघ देव, नागदेव,हिरवा देव,सूर्यदेव, आळ्या देव, खुट्या देव, पार्वती, हनुमंत,बहिरम देव, खंडेराव,
पांढरमाता, डोंग-यादेव' इत्यादी देवी देवतांना  पुजलेजाते.
तसेच ह्या जमाती मध्ये भगत व डाकीण ह्या प्रथा देखील रूढ
आहेत. कोकणी/कोकणा जमातीमध्ये स्त्रीया गळ्यात चांदीची साखळ, हासळी, सोन्याच्या पुतळ्यांचा हार, डोरलं, व रंगबेरंगी मन्यांचे हार, पोवळ्यांचा हार घालतात. दंडात चांदीचा कडा, येल्या, येली, हातात कंकण, नाकात फुली, कानात बाळ्या, पायात पैंजन तसेच सौभाग्याच लेनं गळ्यात मंगळसुत्र, डोरलं, पायात जोडवे वापरतात. पुरूष कानात कुडक्या, मनगटात चांदीचा वाळा, कंबरपट्टा इत्यादी दागीने वापरतात. कोकणी/कोकणा जमातीचे विविध कार्यक्रमांच्या व सणाच्या वेळी संबळ व सनई, डफ, पावरी,चिरक्या, तुर- काश्याची थाळी, डफली इत्यादी वाजवीतात. 



 अर्धवट किंवा अजिबात ओळख नसलेली महाराष्ट्रातील एक मोठी आदिवासी जमात म्हणजे कोकणा किंवा कोकणी ही होय. या जमातीची काही अंशी 'कोकणा- कोकणी आदिवासी इतिहास आणि जीवन' येथे  ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाच-साडेपाच लाख लोकसंख्या असलेल्या एवढया मोठया जमातीची ओळख महाराष्ट्रालाही नीटशी नसावी, म्हणजे त्या समाजातील शक्तिस्थळांना आपण मुकल्यासारखेच असतो. 'कोकणा-कोकणी' ही संद्न्या व्यवहारात आपण इतक्या सहजपणे वापरतो, की कोकणी माणूस म्हणजे कोकणात वास्तव्य असलेला गृहस्थ, असा सर्वसाधारण समज असतो, आणि ते बरोबरही आहे. परंतु या नावानेच एखादी आदिवासी जमात असेल यावर फारसा कोणाचा विश्वास बसत नाही. महाराष्ट्रात या जमातीचे वास्तव्य नाशिक, ठाणे, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आहे, तर गुजरातेत डांग, नवसारी, धरमपूर, सुरत या जिल्ह्यांमधून आहे. या जमातीचा व्युत्पत्तीविषयक इतिहास पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला होता. कोकणी समाजाच्या व्युत्पत्तीविषयक इतिहासावर पहिल्यांदाच कोणीतरी प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येते. प्रा. बी. ए. देशमुख यांचे हे काम एतिहासिक झालेले आहे. कोकण संद्न्येचा भौगोलिक संदर्भ हा अलीकडचा आहे, तर रत्नागिरी परिसरात, समुद्र किनारपट्टीला लागून आर्य येण्यापूर्वी 'कुंकण' नावाचे नागकुल वास्तव्य करीत होते. ते मोठे पराक्रमी कुल होते आणि या 'कुंकण' कुलाच्या काहीतरी चिरस्मरणीय कामगिरीमुळेच या प्रांताला 'कोंकण' हे नाव पडलेले असून, कुंकण कुलाचे वारसदार म्हणजे आजचे कोकणा- कोकणी आदिवासी, असा एएतिहासिक निष्कर्ष म्हणजे प्रा.बी.ए.देशमुख यांनी  लावलेला आहे. पहिल्या प्रकरणात भारतातील आदिवासींची सर्वसाधारण ओळख करून देण्यात आलेली आहे, तर दुसर्‍या प्रकरणात कोकणा- कोकणींचा व्युत्पत्तीविषयी 
 इतिहास मांडण्यात आलेला आहे. कोकणाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची ओळख तिसर्‍या प्रकरणात करून देताना लेखकाने जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध सामाजिक अवस्था आणि होणारे सांस्कृतिक संस्कार यांचा पट मांडला आहे. त्यात विवाह, पोशाख, कुटुंब, घर व निवास, पाडे आणि वस्त्या, नातेव्यवस्था व कुळे, आहार व आरोग्य, कोकणी बोलीभाषा, कोकणा- कोकणी धर्म, धार्मिक मध्यस्थ- भगत, डोंगरी देव आणि शेवरी खेळविणे, याचे यथार्थ चित्रण केले आहे. कोकणाच्या या विविध सामाजिक-सांस्कृतिक ओळखही या पुस्तकातून वाचकांना होते. 'डोंगरी देव उत्सव म्हणजे कोकणाच्या सांस्कृतिक जीवनाचा कळसच होय,' असे लेखक एके ठिकाणी म्हणतात, त्याचा प्रत्यय पुस्तक वाचताना आल्याशिवाय राहात नाही. कोकणा- कोकणींची आर्थिक स्थिती सांगताना शेती हा मूळ व्यवसाय असला तरी ४० टक्के कोकणा भूमिहीन आहेत. काबाडकष्ट करणार्‍या या समाजाला अन्नधान्य संचय किंवा बचतीची सवय नाही; पर्यायाने आर्थिक हलाखीला पारावार नाही.
 संदर्भ -कोकणी कोकणा (प्रा.बी.ए.देशमुख) 

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या
  1. आदिवासी समाजाचे Gothra(गोत्र) कोणते ?

    उत्तर द्याहटवा
  2. आदिवासी समाजात अनेक जाती येतात.त्यामुळे गोत्र त्या-त्या जातीनुसार भिन्न असावेत.

    उत्तर द्याहटवा
  3. कृपया फॉन्ट चांगला आणि जरासा मोठा वापरावा. या फॉन्टमधील माहिती वाचायला त्रास होतो.

    उत्तर द्याहटवा
  4. देशमुख कुळाची कुळदेवी व गोत्र काय आहे

    उत्तर द्याहटवा
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.