Ads Area

(Google Ads)

कोकणी कोकणा बोलीभाषा



                आदिवासी कोकणी कोकणा समाजात प्रामुख्याने कोकणी हि स्थानिक भाषा बोलली जाते.या भाषेची कोणतीही उपभाषा नसावी.कोकणी भाषा देखील इतर भाषेप्रमाणे मैलोमैली, पदोपदी बदलत जाते.यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या  भाषेला बुन्धाडी भाषा म्हणतात.तर घाटावर म्हणजे पिंपळनेर परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला  घाटली भाषा असेही म्हटले जाते.जसजसे अंतर वाढत जाते तसे या भाषेतील लईत ,सुरात बदल होत जातो.अर्थात त्या-त्या भागानुसार तेथील भाषेचा आरोह-अवरोह,चढउतार,लय दिसून येते.जसे  कोकणी भाषेवर खानदेशात अहिराणी भाषेचा प्रभाव दिसून येतो.तर नाशिक जिल्यातील पेठ,सुरगाणा,त्र्यंबक,कळवण ,सटाणा,दिंडोरी  भागात तेथील मराठी भाषेचा प्रभाव दिसून येतो.त्याचप्रमाणे नवापूर भागात गुजराती आणि स्थानिक मावची भाषेचा प्रभाव दिसून येतो.याप्रमाणे  गुजरात आणि ठाणे जिल्ह्यात तेथील भाषेचा प्रभाव दिसून येईल.गुजरात मधील डांग भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेला डांगी भाषा असेही म्हणतात.
            समजण्यास अत्यंत सोपी आणि बोलण्यास ओघवती मायाळू वाटणारी अशी कोकणी भाषा आहे.मैलोमैली भाषेतील लय बदलत जाते तशी त्यातील गोडवा देखील वाढत जातो.समजण्यास सोपी असली तरी बोलण्यास मात्र थोडीफार कसरत करावीच लागते.या भाषेवर मराठी भाषेचा प्रभाव दिसून येत असला तरी  बऱ्याच अंशी कोकणी भाषेत स्वतंत्र असे शब्द ऐकण्यास मिळतात जे इतर कुठल्याही भाषेत आढळून येत नाही.या भाषेत एकेरी भाषेचा वापर होताना दिसतो.परंतु यामध्ये कुठलीही नकारात्मकता नसते हे विशेष. 
                  कोकणी भाषेत देखील स्वतंत्र असे उद्बबोधक वाक्य,कोपरखळ्या,गावरान म्हणी,वाक्प्रचार वापरली जातात.ज्यामधून भाषेतील सौंदर्य,आणि सखोलता दिसून येते .
             
 

                                                माहिती update करणे सुरु आहे 

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.