Ads Area

(Google Ads)

जीवनशैली

        माहिती update करणे सुरु आहे  
आदिवासी कोकणी कोकणा समाजाची जीवनशैली
 
पारंपरिक पद्धतीने भात लावणी करताना आदिवासी महिला - https://youtu.be/OHcnSm8UbxU

मजुरी नसल्याने एका निवांत क्षणी समाजबांधव
रानातून सागाची पाने गोळा करून आणताना समाजातील काही तरुणी
संध्याकाळच्या जेवणाची तयारीसाठी अस्सल गावरान तांदूळ सुपात निवडताना कोकणा स्री
                                 भाताची लावणी करताना एक समाजातीलच एक स्री
     दिवसभर काम करत दुपारी जेवण करून थोडेसे निवांत विश्रांती घेताना समाजातील कोकणी स्रिया  

आदिवासी,कोकणी कोकणा  लोक हे सहसा रानावनाच्या जवळ किंवा एखाद्या लहान पाणसाठ्याच्या कडेला किवा आपल्या शेताजवळ राहतात. अलीकडच्या काळात कोकणी कोकणा  लोकाची  गावे खूप मोठ-मोठी होत आहेत.गावंचा विस्तार फार मोठा झालाय पण गावात हव्या तश्या सुविधा अजूनही प्राप्त नाहीत.जेमतेम एक किरणा दुकान एखाददुसरी टपरी असते.बाकी सर्व आठवडी बाजारामध्ये शेजारील गावात किवा शहरात जाऊन खरेदी करीत असतात. आरोग्य ह्या बाबतीत अतिशय सुदैवी लोक असतात हे. आपल्याला मिळणारी हवा हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे.  मात्र झाडाफुलांमधून आणि डोंगरांना कुरवाळून येणारी अतीशुद्ध हवा चोवीस तास मिळते.  दुसरे म्हणजे पाणी! कातळावरून वाहणारे नितळ शुद्ध पाणी त्यांना उपलब्ध असते.  चूल पेटवण्यासाठी लाकडे गोळा करताना, शेळ्यांसाठी हिरवा पाला आणताना, पाणी वाहून आणताना आणि रानातून मिळणारे विविध खाद्यपदार्थ आणताला  अविरत पायपीट चाललेली असते. ढोरवाटा, टेकड्या, घाट अश्या भागातून  सतत चाललेले असतात, तेही अनेकदा वजन उचलून! त्यामुळे त्यांचे शरीर अतिशय काटक असते. दिसायला ते फार क्षीण आणि हडकलेले दिसतील, पण प्रचंड चिवट असतात. अस्थीरोग, श्वसनरोग असले प्रकार त्यांना सहसा होत नाहीत. हृदयविकाराचा तर प्रश्नही उद्भवू शकत नाही. बराच काळ अन्नपाण्यावाचून चालत राहिल्यामुळे शरीराचा चिवटपणा अधिकच वाढतो. महत्वाचे म्हणजे आहार! या समाजातील बरच  लोक पूर्वी  कंदमुळे खात असत. तसेच, पालेभाज्या खातात. नित्याचे जेवण म्हणजे डाळ-भात, कंदमुळे आणि एखादी हिरवी पालेभाजी! मांसाहार, ज्याला ते 'शाक' म्हणतात, तो म्हणजे जलाशयातून मासे किंवा इतर काही पकडणे! हा प्रकार आणि शिकार  काहीजण नित्य करत असतात. बर्‍याचदा आदिवासी कोकणी कोकणा अत्यंत शुद्ध हवा, चांगले पाणी, निसर्गाच्या जवळ असलेला आहार आणि सततची अंगमेहनत ह्यामुळे सर्दी, खोकला, ताप व सर्पदंश हे प्रकार होत राहतात, पण त्यांचे प्रमाण व तीव्रता कमीच असते. ह्या सर्व घटकांशिवाय आपल्या जगात असलेली स्पर्धा आणि ताण त्यांच्या जगात जवळपास नसल्याने  मानसिक आरोग्यही खणखणीत राहते व पर्यायाने त्याचाही चांगलाच परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो. त्यामुळेच कोकणी कोकणा लोक आपल्याच धुंदीत रानावनात फिरत राहतात.अविकसित असण्याचे वैषम्य नसते, स्पर्धात्मक जीवनाचा ताण नसतो, अयशस्वी ठरण्याचे भय नसते.आणि हेच या समाजाच्या सुखाचे खरे कारण असावे.
          हल्ली मात्र इतरत्र बघून किवा स्पर्धात्मक जीवनामुळे आणि स्थलान्तर,शिक्षण यामुळे  राहणीमान आणि पोशाख आहार इत्यादी बाबतीत फारच सुधारणा होताना दिसत आहे.

समूहजीवन - सहसा एका वस्तीत चाळीसएक घरे असतात. ही घरे मातीची असतात व  कौलारू असतात. ह्या घरांचा आकार किती असावा हे ज्याचे तो ठरवतो. घराला कसलेही संरक्षण नसते कारण संरक्षण करायचे कशाचे हाच प्रश्न असतो. घरामध्ये चकचकीत दिसणारी भांडी असतात. एका दोरीवर धुतलेले, न धुतलेले असे सगळेच कपडे टांगलेले असतात. कपाट वगैरे प्रकार सहसा ठेवत नाहीत. चुलीवर स्वयंपाक केला जातो. आंघोळीसाठी घराबाहेर एक लाकडी काठ्या उभारून, त्यावर तीन बाजूंनी फडकी,पोते  टाकून उभी केलेली बाथरूम असते. एखादा लहानसा जलाशय जवळच असतो. कोकणी कोकणा एकापेक्षा अधिक लग्न करत नाहीत. मात्र एखाद्याची पत्नी दगावली आणि त्याला लहान मुले असली तर वस्तीच्या एकमतानुसार त्याचे कोणाशीतरी  लग्न लावून देण्यात येते व ती नवीन नवरी त्या मुलांचे संगोपन करू लागते. एका कुटुंबात सहा ते सात सदस्य असतात. सहसा दोन ते तीन मुलांनंतर मुले होऊ देत नाहीत. लग्न मात्र फार लवकर लावून देण्यात येते. हे लोक सर्व सण साजरे करतात. मात्र होळी ह्या सनाला सर्वाधिक महत्व असते असे म्हणतात. साधारणपणे दोनशे ते सहाशे माणसे एकेका वस्तीत राहतात. त्यांच्या भांडणे वगैरे होण्याची कारणेच मुळात नगण्य असतात,आणि झाली तरी गावातील पाटील ५-६ शहाणी बुजुर्ग मानस मिळून (पंच) गावातच मिटवतात . जे घ्यायचे ते निसर्गाकडूनच घ्यायचे असल्यामुळे कोणाशी कश्यासाठी भांडायचे?
.
सौंदर्य व व्यक्तीमत्व - कोकणी कोकणा रंगाने राखाडी आणि पांढरेशुभ्र डोळे व  सततच्या मेहनतीमुळे रंग रापलेला असतो. शरीराच्या शिरा दिसत असतात. शिक्षणाचा गंध नसल्यामुळे चेहर्‍यावर सतत गोंधळल्यासारखे असतात. मात्र हे लोक अजिबात बावळट नसतात. ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यात चांगले हुषार असतात. शेतात,रानात कुठे गेल्यावर काय भाजीपाला किंवा मुळे मिळतील हे त्यांना चांगले ठाऊक असते.शेतातून, रानातूनच ते त्यांची औषधेही प्राप्त करतात. लहानसहान इन्फेक्शन्स, त्वचारोग, जखमा ह्यावर त्यांच्याकडे जालीम रानटी औषधे असतात. मात्र सततचे शेती मजुरी कष्टाचे काम,अशिक्षित असणे, अस्वच्छ असणे, पैसा नसणे, आराम नसणे ह्या कारणांनी ह्या लोकांचे सौंदर्य बाधीत होते. अंगावर सहसा चरबी अगदीच कमी असते. पुरुषांमध्ये दंडाचे मसल्स आणि पोटर्‍यांचे मसल्स वेल डेव्हलप्ड असतात.  अनेकजण नुसतेच रानात फिरतात तर काही फक्त शेती करतात ते चिवट आणि काटक असतात स्त्रिया काळ्यासावळ्या असल्या तरीही त्वचा सहसा तुकतुकीत असते. स्त्रिया अंगाने भरलेल्या वगैरे नसतात. किंबहुना अगदीच बारीक अश्या अनेक स्त्रिया असतात. पैसे नसल्यामुळे कपडे किंवा दागिने ह्यांचा प्रश्न येत नाही. तसेच, जीवनशैली वेगळी असल्याने मेक-अपचाही प्रश्न येऊ शकत नाही. आता काही स्त्रिया गाऊन,साडी घालून हिंडतात ही थोडीशी अधुनिकता! मात्र ह्या स्त्रियांच्या देहबोलीत मोठे सौंदर्य लपलेले असते. खणखणीत आवाज, ताडताड चालणे, पातळ पार मांड्यांच्यावर घेऊन खोचलेले,   शहरी समाजाच्या तुलनेत बहुधा ह्या समाजाने स्तनपानाला अधिक महत्व दिलेले दिसते.स्रियाअत्यंतशांत आणिसुस्वभावी,मृदूआणि दयाळू -मायाळूअसतात.

स्वच्छता - कोकणी कोकणा स्वच्छतेच्या बाबतीत मात्र समाजात काही लोक स्वच्छ  राहात नाहीत. हि मंडळी दररोज अंघोळ करतातच असे नाही.पण सणासुदीला लग्न समारंभात मात्र अत्यंत नीटनेटके राहतात.अनेकदा पाण्याचा अभाव व स्थलांतर हे त्यामागील कारण असते. लहान मुले मातीत खेळत बागडत  पडलेले अन्नकण देखील खातात. नाक वाहात असते.अन्न उघड्यावरच पडलेले असते. कपडेही स्वच्छ नसतात. भांडीकुंडी मात्र नजर लागावी इतकी चमकत असतात,अलीकडच्याकाळात मात्र खूप मोठ्या प्रमाणात शिक्षित वर्ग वाढल्याने अस्वच्छता क्वचितच दिसून येते .उलट शहरी भागापेक्षा अधिकची स्वच्छता व टापटीप पणा  दिसून येते.

संधी - शासनाने ह्या आदिवासी लोकांना संधी देऊ केलेल्या आहेत. शिक्षण मोफत आहे. नोकरीसाठी आरक्षण आहे. उदरनिर्वाहासाठी लहानमोठे व्यवसाय उभारण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. स्थलांतर करावे लागत असल्यास उगाच त्यांना कोणी 'येथे का राहायला आलात' असे विचारून त्रास देत नाही. (तेही अश्याच जागी राहतात जिथे राहिल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही). एकाच ठिकाणी राहणार्‍यांपैकी काहींना शासनाने घरकुल योजनेअंतर्गत घरेही बांधून दिली आहेत. मात्र एक खूप मोठ्ठा प्रॉब्लेम ह्या लोकांना भेडसावतो. तो म्हणजे ह्यांच्या नावचे आरक्षण कोणी भलतेच पळवतात व हे प्रचंड प्रमाणावर घडते. ह्या लोकांपैकी कोणी खरोखर शिकला आणि आरक्षण मागायला गेला तर त्या जातीची सर्व आरक्षणे आधीच संपल्याचे समजते. नंतर छडा लागतो की ज्यांनी ते आरक्षण मिळवले ते आर्थिकदृष्ट्या चांगले भरभक्कम होते. म्हणजे बघा, शासन काहीतरी करू पाहात आहे, हे लोक शिकून सुधारू पाहात आहेत आणि आपल्याकडचे भ्रष्ट लोक ती संधी त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाही आहेत.हि खूप मोठी शोकांतिका आहे.



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
  1. खुप चांगली माहीती आपण लोकास पूर्वत आहात त्याबद्दल धन्यवाद / तुम्ही आमचा ब्लॉग ही पाहू शकतात Majhi Naukri

    उत्तर द्याहटवा
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.