कणगी
धान्य ठेवण्यासाठी मातीच्या कणगीचा वापर केला जातो
माहिती update करणे सुरु आहे
कोकणी /कोकणा आदिवासींची जुनी घरे
आदिवासी कोकणी कोकणा समजातील प्रत्येक गावातील घरे हि बहुधा कौलारू आणि मातीच्या भिंती असलेली असतात संपूर्ण लाकडाचा वापर करून गावातीलच कुशल सुताराकडून घर बनवलेली असतात .कौलापासून संपूर्ण वस्तू या नैसर्गिक असतात .दगड आणि मातीच्य माचीवर म्हणजेच चीरीवर जमिनीपासून थोड्या उंचीवर बांधलेली असतात .हि घरे अत्यंत कुशल आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम बनवलेली असतात.या घराला मधेभागी दोन किवा अधिक भक्कम आणि जाड अशी लाकडी खांबे असतात.त्यावर एक जाड लाकडी दांडी असते त्याला आडया असे म्हणतात.आजूबाजूला सुंदर आणि नक्षिदार लाकडी कोरीव काम केलेली खांब असतात .ती दगडी चौकोनी आकाराच्या कुम्भीवर ठेवलेली असतात.
काही घरे मात्र जमिनीवरच मातीच्या कुडाची बनवलेली असतात यामध्ये भिंतीत उंच आणि लांब अशा कारवी या वनस्पतीचा वापर केलेली असतात .अलीकडच्या काळात मात्र खूप मोठ्या प्रमाणावर घरामध्ये आधुनिकता दिसून येते .
५-१० वर्षापासून समाजात कमालीचा बदल झालेला दिसून येतो अर्थात काळानुसार घरांच्या रचनेत देखील खूप बदल झालेला दिसतो. अलीकडच्या काळात सिमेंट ,लोखंड,पत्रे,आधुनिक कौलं इत्यादी वस्तूंचा वापर करून नविन घरे बांधताना दिसून येत आहेत.सध्याच्या काळातील काही घरांची राचनाचीत्रे पुढील चित्रात दिसून येते.