नाचणी (कंसरा)
नाचणी (एक धान्य) हया धान्याला कोकणी-कोकणा आदिवासी समाजात कंसरा असे संबोधले जाते.नाचणी हे पीक पावसाळ्यात शेतात लागवड केले जाणारे पिक आहे.या पिकाची वैशिष्ठपूर्ण अशी लावणी,खुरपणी,कापणी,मळणी,उडवणी,रास पूजन,औक्षण,आणि कणगी मध्ये साठवण अशा पद्धतीने पिक घेतले जाते.हे पीक परिपक्क झाल्यानंतर कापणीच्या दिवशी नाचणी (कंसरा देव) पुजेसाठी मांसाहारी (कोंबडीचे) नैवद्य दिले जाते.कापणी झाल्यावर एका शेणाने सारवलेल्या खळ्यात रचून ठेवले जाते.नंतर या पिकाची मळणी साधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात केली जाते. मळणी झाल्यानंतर धान्याची खळ्यात रास रचून पळसाची फुले,गोमुत्र,तांदूळ,नारळ,अगरबत्ती,गोड-भात,कोंबडीचे नैवद्य चढवून पूजा केली जाते. स्वयपाक करून खळ्यावरच नैवद्य म्हणून जेवण करतात.नाचणीच्या दान्यामध्ये पळसाचे फुले टाकून पूजा केली जाते संपूर्ण पूजा झाल्यानंतर दाणे बैलगाडीने घरी नेतात.घरी देखील अशाच प्रकारे औक्षण करून स्वागत केले जाते. अशा प्रकारे कोकणी कोकणा आदिवासी समाजात रूढी परंपरानूसार नाचणीचे (नागली) श्रदधेने पूजन केले जाते.

आळया देव
आदिवासी कोकणी कोकणा समाजात अनेक पर्मापारिक रूढ असलेल्या प्रथा-रूढी आहेत.अशीच एक परंपरा म्हणजे आळ्या देव होय.
परंपरे नुसार अमावसेच्या दिवशी गावाच्या वेशीवर (शिव) देवाचे स्थानकाजवळ एक दगड रूपी
मूर्ती अथवा शिळा असते. त्या ठिकाणी देवाची गावातील भगत एका विशिष्ट अशा पद्धतीने आदिम पद्धतीने पूजा करतो.या पूजेसाठी
गावातील खास ज्येष्ठ
पुरुष मंडळी देखील उपस्थित असते. पूजा करण्यासाठी तेथील
दगडी मूर्तीवर शुद्ध पाणी व विविध वन औषधी, वनस्पतीच्या मुळ्या टाकुन
देवाला अंघोळ घालून देवाच्या आंघोळीचे पाणी भांड्यामध्ये जमा करतात.
आणि हे पाणी aअवत आणून गावातील सर्व कुटुंबात वाटले जाते. यानंतर हे पाणी
प्रत्येक शेतकरी आपापल्या शेतात पेरलेल्या पिकावर शिंपडून देत असतो.या
पाण्यात वन औषधींचा अंश असल्याने पिकातील कीड,रोगराई दूर होण्यास मदत होते
अशी
या लोकांची धारणा आहे.अर्थात यामध्ये विविध वनस्पतींचा अंश असल्याने फरक
देखील जाणवत असावा म्हणूनच तर आजतागायत हि प्रथा अजूनही अशीच सुरु आहे.आदिवासी कोकणी कोकणा समाजात अनेक पर्मापारिक रूढ असलेल्या प्रथा-रूढी आहेत.अशीच एक परंपरा म्हणजे आळ्या देव होय.
वर्षानुवर्षे हि प्रथा सुरूच आहे यामध्ये आजपर्यंत कुठेही खंड पडताना दिसत नाही हे विशेष.याशिवाय या दिवशी संपूर्ण गावातील मंडळी कोणीही कोणत्याही कामावर जात नाहीत व गावात सर्व गाव मिळून एकत्रच बोकड कापुन सर्वाना मटणाचे समान वाटणी करून प्रत्येकाच्या घरी वाटा दिला जातो आणि मग कुटुंब मिळून त्याचा मोठ्या श्रद्धेने आस्वाद घेत असतात.
खुटया देव
आदिवासी कोकणी, कोकणा, कुकणी समाजातील लिक पिढीजात परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पळत आहे. यातीलच एक प्रथा अथवा सन म्हणजे खुटया देव होय. साधारणपणे श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी अथवा पौर्णिमेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी खुट्यादेव सन साजरा करीत असतात. निसर्ग पुजक आदिवासी कोकणी, कोकणा समाजातील लोक आपल्यापल्या शेतातील पिक निरोगी राहून भरघोस पिक यावे, शेतातील पिकांवर कीटक,रोगराई पसरू नये, यासाठी श्रावण महिन्यात ‘खुट्यादेव’ या निसर्ग देवतेची पूजा करून खुट्यादेव सन साजरा करतात. म्हणजेच या दिवशी सर्व .समाज बांधव सागाच्या झाडाची पाने असलेली फांदी किवा बांबूची उंच काठी आणुन आपल्या शेतातील पिकाच्या मध्यभागी रोवतात.म्हणजेच आजूबाजूच्या संपूर्ण पिकला सुरक्षित ठेवण्याची भावना या खुटीतून या ठिकाणी जाणवते. शेताच्या मध्यभागी गाडलेल्या या खुटीवरून या सणाला देखील खुट्यादेव म्हटले जाते.आपल्या शेतातील पिकामध्ये स्थापन करून त्याची विधिवत पूजा केली जाते व आपल्या पिकावर कोणतीही रोगराई पसरू नये, उत्तम व भरघोस पिक यावे या साठी निसर्ग देवतेची प्रार्थना केली जाते.निसर्गाशी नाळ असलेल्या या समाजातील लोक या दिवशी संपूर्ण गावात दिवस (सुट्टी/याळ पाळणे) पाळला जातो.यावरून एक गोष्ट नक्कीच जाणवते कि आदिवासी कोकणी कोकणा समाज आपले प्रश्न अडचणी ह्या बर्याच अंशी निसर्गाच्या साह्याने सोडवत असे.आणि आपले जीवन सुखकर करण्याचा नैसर्गिक प्रयत्न करीत असे.

छायाचित्रे – श्री.कैलास बहिरम.FB Ac
वाघ,नाग देव
पाटली पूजन
पाटली पूजन आदिवासी कोकणी कोकणा समाजाचे लोक कुुुटुंबातील व्यक्तीचा मुत्यू झाला की एका दगडावर त्याचे कोरीव काम करून कोणत्यातरी एका जागेवर त्या दगडाला (मुर्ती) उभे करतात त्या दगडाची (मुर्ती) पूजा प्रत्येक वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात करतात पूजा करताना झाडाच्या फांद्या तोडून त्या फांद्चाचे मंडप केला जातो.पाटली देवाला (कोंबडा ,बोकड,मोहाची दारू देवुन पूजले जाते).
घाटा पूजन
घाटा हा सण मे महिन्याच्या शेवटी किंवा जुन
च्या पहिल्या आठवड्यात आदिवासी कोकणी समाजाचे लोक साजरा करतात. साधारणपणे प्रत्येक वर्षी
पावसाळ्याच्या सुरुवातीला साजरा केला जातो . घाटादेवाचे पूजन करताना गावातील प्रत्येक
कुटुंबाकडून वर्गणी केली जाते (कोकणी आदिवासी भाषेत वर्गाणीला फाळा असे
म्हणतात) वर्गणी जमा झाल्या नंतर वर्गणीचे पैशाचे बोकड आणले जातात. बोकड
आणल्या नंतर गावातील जेष्ठ पुरुष मंडळीच्या सवडीनुसार एखाद्या मंगळवारी घाटा देवाचे रूढी परंपरा नूसार
श्रदधे नूसार पूजन केले जाते. गावाच्या जवळच्या माउली स्थानक किंवा आसरा (देवाचे स्थान) पाहून कोकणी आदिवासी समाजाचे लोक या ठिकाणी पूजा अर्चना करतात.पूजा करीत असताना भगत
(महाराज) आपल्या पूजेतून अंगात आलेल्या स्थितीत सर्व गाव,जनावरे,प्राणी,पक्षी,लहान थोर मंडळी आणि शेतीबाडी , पाऊसपाणी इत्यादीमध्ये सुख नांदू दे म्हणून प्रार्थना करीत असतो.भगताच्या हस्ते हि सर्व पूजाअर्चा केली जाते. पूजा वगैरे झाल्यानंतर सर्व बोकड मारले जातात.त्यानंतर मटन
केली जाते. गातील प्रत्येक कुटुंबाला नैवद्य म्हणून मटन दिली जाते.
कोकणी आदिवासी रूढी परंपरानूसार श्रदधेनूसार घाटा प्रत्येक वर्षी केला जातो. गावात सुख-समृद्धी लाभो व पावसाळ्याचे पीकपाणी आरोग्य धन धान्य चांगले येण्यासाठीच हा सर्व खटाटोप केला जातो.

रानवा,हिरवा देव
पंचमी
उत्तर द्याहटवा