दिवाळी म्हटली की गोडधोड पदार्थ, नवीन कपड्यांची खरेदी, फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज असा हा आंदोत्सवाचा सण साजरा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.शहरी भागात दिवाळी म्हटले की फटाक्यांची आतषबाजी, घरासमोर लावलेले आकाश कंदील, दिवाळी पहाटचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असतो.
आदिवासी कोकणी कोकणा हे आपले सर्व सण निसर्गावर आधारित साजरे करत असतात. दिवाळी सणसुद्धा निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाला कोणतीही हानी न पोहचवता साजरे करत असतात. या दिवशी प्रत्येकाचे घर शेणा-मातीने सारवून काढले जाते. घरातील सर्व सदस्य घर सजवण्यासाठी कंबर कसत असतात. दाराजवळ आंब्याच्या पानांच्या व मखमलीच्या फुलांच्या माळा बांधल्या जातात. सर्व घर मखमलीच्या फुलांनी सजवले जाते.
या दिवाळीचे वैशिष्टय़ असे की फटाक्यांची आतषबाजी केली जात नाही. शेण-मातीने सारवलेल्या घरांच्या भिंती सजवून घराला लावलेल्या गोवऱ्यांच्या दिवटय़ांनी घर उजळवण्याची परंपरा आहे. या घरांना पणत्या किंवा कंदील लावलेले नसतात.निसर्गाचे पूजन करणाऱ्या आदिवासींच्या पाडय़ावर आजही तांत्रिकपणा नाकारून निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता दिवाळीसण साजरा केला जातो.
इतर समाजापेक्षा वेगळय़ा पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाला ‘गाव दिवाळी’ असे संबोधले जाते. आदिवासी कोकणी कोकणा समाजामध्ये मध्ये तर बारस, तेरस, चावदस आणि पूनम अशी चार दिवस चालणारी दिवाळी मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते.मात्र आदिवासी कोकणी कोकणा बांधवही हा सण अतिशय वेगळ्या पांरपारीक पद्धतीने साजरा करतात.पूर्वी आदिवासी कोकणी कोकणा समाज मुख्यतः शिकार आणि गुरे पालन करणे हे व्यवसाय करीत असत यात जंगल आणि जंगली प्राणी हे नात अगदी पूर्वीपासून चालत आलेलं आहे.म्हणून वाघासारख्या हिंस्त्र श्वापदापासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून आदिवासी ग्रामीण भागात वाघबारस साजरी करण्याची प्रथा आहे.वसूबारसेच्या म्हणजे आदिवासींच्या वाघबारशीच्या दिवशी गुरे चारणारे गुराखी (ढोरक्या) नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी जंगलात जातात. या दिवशी सर्व गुराखी उपवास करतात. कोकणानी वाघाला देव मानले आहे. म्हणूनच काही भागांत वाघोबाची मंदिरे पाहावयास मिळतात. अनेक ग्रामदैवतांच्या मंदिराच्या बाहेर वाघांच्या मूर्ती आहेत.वाघ देवतेचे मंदिर हे गावाच्या वेशीवर असते. मंदीरात दगडी चिऱ्यावर काही ठिकाणी लाकडा वर वाघ देवता, नागदेवता, मोर, सुर्य, चंद्र यांची चित्रे कोरलेली असतात. वाघबरसच्या दिवशी वाघ मंदीराच्या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळी, भगत, मुले, मुली नवीन कपडे घालून एकत्र येतात. यावेळी गाईचे शेण, गोमूत्राने वाघोबाच्या मंदिराचा संपूर्ण परिसर शिंपडून सुश्चित करतात. त्यानंतर आदिवासी भगत रुढी पंरपरेनूसार वाघदेव, नागदेव, सुर्यदेव, चंद्रदेव, धरतीमाता जंगलाची, निसर्गाची पुजा करतात. पुजेवेळी देवताच्या मुर्तीला शेंदुर लावून दुध व पाण्याने आंघोळ घालतात. पुजेत तांदुळ, नागली, पाचखाद्य, अगरबत्ती दिवा लावून पुजन केले जाते. पुजाविधी झाल्यानंतर ग्रामस्थ नारळ, गोड पदार्थाचा नैवद्य दाखवितात. पेठ दिंडोरी, कळवण, सुरगाणा,साक्री,पिंपळनेर,नंदुरबार, सटाणा, इगतपूरी तालुक्यातील बहुतेक भागात वाघदेवतेला गोड नैवद्या बरोबरच तिखट (बोकडाचा नैवद्य) दर्शविला जातो. या सणाच्या आधी एक महिना आदिवासींचे सारे देव रानात पारध करण्यासाठी गेलेले असतात. ते वाघबारसेला घरी येतात. त्यामुळे या दिवसाला आदिवासी जीवनात एक वेगळे महत्त्व आहे. वाघबारसच्या निमित्ताने आदिवासी शेतकाम बंद ठेवतात. वाघबारसला प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व तिखट नैवद्यासाठी (बोकड) वर्गणी गोळा केली जाते. संध्याकाळी गावातील सर्व गुरे, पाळीव प्राणी वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणून पुजन केले जाते. यानंतर गावातून गुराखी गाने गात गुरुांची मिरवणूक काढली जाते. 'आली धिन धीन दिवाळी हो...आली धिण धिन दिवाळी... गाई म्हशीला ओवाळी हो...बहीन भावाला ओवाळी.. आली वर्षाची धींडवाळी... या सारे गीत गावून आदिवासी बांधव मनोभावे पुजा करतात. धनधान्य पिकू दे, सर्वांना सुखी ठेव, गुराढोरांना सुखी ठेव अशी मनोभावे प्रार्थना करीत वाघबारस मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळी सण त्या त्या भागा नुसार थोड्याफार फरकाने साजरी केली. गावातील आदिवासी बांधव शक्यतो निसर्गदेवतांची पांरपारीक पुजा करतात.अलीकडे शहरी करणामुळे इतर समाजातील काही प्रथांचे समावेश करून देखील साजरी होताना दिसत आहे.
बऱ्याच ठिकाणी 'पावडदेव ' यात्रा असतात.यामध्ये गावातील एखादी व्यक्ती रानवा देवाचा भक्त असतो .वर्षातून एकदा म्हणजे या दिवशी त्याच्या अंगात येत असते.त्यालाच पावडदेव असे म्हणतात.आदल्या दिवसापासून अंगात आले असल्याने संपूर्ण रात्र जागरण करून पावडदेवाची पुजा केली जाते.सकाळी लवकर उठून कंबरेवर धज (ध्वज) घेऊन पावडदेव गावाजवळील स्थानकाकडे प्रस्थान करतो.त्यासोबत त्याची काळजी घेणारी गावकरी मंडळी देखील असते.नाचत नाचत नदीकडे जात असताना सोबत एक बोकड ,एक मेंढा,कोंबडे वगैरे देखील घेऊन जात असतात.नदीजवळ म्हणजे पावडदेव स्थानकाजवळ गेल्यावर पावडदेव भगत तेथील देवस्थानाला नारळ वगैरे चढवतो त्याच क्षणाला सर्व जित्रब म्हणजे जीव (बकरे कोंबडे वगैरे) बळी दिले जातात यात कोणताही विलंब केला जात नाही हे विशेष..............अजुन पुढे लेखन सुरू आहे....
आदिवासी विकास विभागाने स्वयं महाऑनलाईन पोर्टल सुरु.
उत्तर द्याहटवा