आदिवासी कोकणी कोकणा समाजातील पंचमी सण.
आदिवासी कोकणी कोकणा समाजात पंचमीला एक वेगळंपण आहे ते या समाजातील आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत असलेल्या विशिष्ट परंपरेमुळे.अगदी जुन्या काळापासून पिढीजात आणि परंपरागत हा सण कोकणी कोकणा समाजात साजरा केला जातो.या समाजातील लोक मुळातच निसर्ग पूजक असल्याने पंचमीला विशेष महत्त्व आहे.या भिंतीवर विविध प्राण्यांचा चित्रांची पूजा केली जाते . या दिवशी चुलीच्या जवळील भिंतीवर शेणाने सारवून विविध चित्रांचा आराखडा रेखाटला जातो या मध्ये गाय, बैल,नाग,वाघ,सिंह,औत, मानवी साखळी,झाडे,घर,चंद्र सूर्य, चाक विविध आयुध इत्यादी चित्रांचे रेखाटन केले जाते.खरं म्हणजे संपूर्ण समाज निसर्ग,प्राणी पूजक असल्याचे हे द्योतकच आहे.चित्रे काढणे एवढंच या दिवसाचं महत्व नसून, यात संपूर्ण चित्ररूपी निसर्ग देवतांचे पूजन देखील या दिवशी केले जाते.चित्र काढताना जुन्या काळात नैसर्गिक पांढरा रंग तयार करून वापरला जाई परंतु सध्या बाजारात चुना सहज उपलब्ध होत असल्याने चुन्याचा वापर चित्र काढण्यासाठी होत असल्याचे अलीकडे दिसून येते.कोकणी कोकणा समाजात अशा अनेक निसर्ग पूजनीय प्रथा आढळून येतात त्यापैकीच हि एक होय.सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून नागदेवतेची पूजा केली जाते.अलीकडे बरीच मंडळी प्रत्यक्ष वारूळ जवळ नारळ अगरबत्ती लावून पूजा अर्चा करतात. व दुध खीर चढवतात किंवा दुधाची वाटी वारुळाजवळ ठेवतात.कोकणी कोकणा समाजात प्रत्येकाच्या घरात या दिवशी गोड-धोड पदार्थ(कान्होळे) बनवले जातात.यानंतर संध्याकाळी घरात चुलीजवळ भिंतीवर शेणाने सारवून त्यावर पांढऱ्या रंगाने किंवा चुन्याने चित्र काढलेल्या ठिकाणी धान्य पाणी वगैरे ठेऊन भिंतीवर काढलेल्या विविध चित्राची पूजा करतात, आणि त्यानंतर गोड गोड जेवण तयार करून पंचमीला नैवद्य दाखवितात.
भिंतीवरील हे पंचमीची चित्र म्हणजे चित्रकला शास्राचा एक अद्भुत नमुना होय.अर्थात वारली आणि कोकणी समाजातील पेंटिंगचे नमुने यात दिसून येतात. कोकणी कोकणा समाज देखील चित्रकलेला पिढयानपिढया जोपासत आलेला आहे . म्हणजेच वारली चित्रकला हि कोकणी कोकणी समाजात देखील परंपरागत रूढ होती हे या ठिकाणी सिद्ध होते.त्याचप्रमाणे हा समाज देखील चित्रकलेचा उपभोक्ता होता किंवा कलाप्रिय होता असे यावरून दिसून येते.अशाप्रकारे कोकणी कोकणा समाजात पंचमी साजरी केली जाते.