आदिवासी कोकणी कोकणा समाजातील विवाह सोहळा(लगीन)
माहिती update करणे सुरु आहे.
कोकणी कोकणा समाजामध्ये वेगळ्या चालीरीतीने लगीन लावण्याची प्रथा आहे.या प्रथेचा थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देत आहे.यात काही चालीरीतीमध्ये त्या-त्या भागानुसार थोडाफार बदल असू शकतो.आणि कालानुरूप बर्याच प्रथामध्ये आधुनिक बदल दिसून येतात.
पार्श्वभूमी:
आदिवासी कोकणा कोकणी समाज संस्कृती हा जीवनाचा पायामानून आपले जीवन जगत आहेत.प्राचीन काळापासून आदिवासी श्रम,समूह,आणि सहकार्य याच मानवी जीवनमुल्यांच्याआधारे आपले जीवन जगत आहे. आजही आदिवासीँच्या जीवनातील प्रत्येक हालचाल किँवा जीवन व्यवहार, श्रम, समुह आणि सहकार्य याच्याच आधारे होत असते,सण, उत्सव, लग्न, गावपंचायतीद्वारे न्याय- निवाडा,पद्धतीने आजही केला जातो.
आदिवासी कोकणी कोकणा समाजात समाजमान्य व एकपत्नीत्व विवाह प्रथा प्रचलित आहे.या समाजामध्ये आपले कुळ ,आडनाव सोडून इतर कुळात लग्न केली जातात.मामांच्या मुलीशी देखील लग्न केले जाते मात्र आत्याच्या मुलीशी शक्यतो लग्न केले जात नाही.तसेच इतर जवळच्या कोणत्याही नात्यात लग्न जमवले जात नाही.अगदी चुलत मुळात असले तरी अशा नात्यात लग्न केले जात नाही.साधारणपणे १८-२० वर्ष वयामध्ये मुला-मुलींची लग्न करण्याची प्रथा आहे .धकाधकीच्या जीवन्मानामुळे लग्नाच्या वयात थोड्याफार प्रमाणात वाढ झालेली दिसून येते.पूर्वी समाजामध्ये लग्नाला जवळपास ३-४ दिवस लागायचे परंतु इतरांच्या अनुकरणामुळे आता एका दिवसात विवाह सोहळा उरकला जातो.या संपूर्ण लग्नकार्यात अनेक प्रकारच्या आदिम प्रथा पहावयास मिळतात.लग्नकार्यात सर्वाना समान दर्जा दिला जातो.आदिवासी कोकणी कोकणा समाजातील लग्न कार्याविषयी थोडक्यात माहिती क्रमश:देत आहे.
१) मुलगी पसंत करणे :
समाजामध्ये मुलगा किवा मुलगी वयात आले कि अथवा कमावते झाले कि घराची वडीलधारी मंडळी आपल्या मुलामुलींसाठी स्थळ पाहण्याची घाई करतात.सर्व प्रथम परिचयाच्या गावात,परिसरात स्थळ पाहण्यास सुरुवात करतात.आणि योग्य स्थळ असले कि मग मुलगा आपल्या एक दोन मित्रासह किवा जवळच्या नातेवाईकांसह मुलीच्या घरी मुलीला पाहण्यासाठी जातो.सर्वप्रथम मुलगी आपल्या पारंपारिक पोशाख घालून आलेल्या पाहुण्यासाठी पाणी वगैरे घेऊन येते,यानंतर मुलाचे नातेवाईक मुलीला एकदोन प्रश्न विचारतात.यातून मुलगी कशी बोलते याचा शोध घेतला जातो. अगदी ५-१० मिनिटात मुलाला मुलगी कशी वाटते हे पाहायचे असते.यानंतर पाहुणचार करून मुलाकडची मंडळी परत जाते.जर मुलगी पसंत असली तर तसा निरोप ते मुलीकडच्या लोकांना सांगतात. आणि मुलीकडील मंडळी देखील मुलगा पसंत असल्यास दोघात लग्न करण्याविषयी सम्मती होते.
२)पेन पिणे(धरबांधन) :
दोन्हीकडच्या मंडळीची संमती झाल्यावर मुलाकडची गावपंच(जेष्ठ माणसे पोलीसपाटील,सरपंच,मुख्य माणसे)मुलीच्या घरी पेन पिण्यासाठी जातात.याठिकाणी दोन्हीकडील गावपंच जमा होते आणि मग सर्वांच्या समक्ष हे नाते कसे जमले? कोण पाहुणे? कसे आले? कुठून आले? वगैरे.....त्यांचा परिचय दिला जातो आणि मुलामुलीच्या वडिलांना लग्नासाठी पूर्णपणे तयार आहात काय ? अशाप्रकाच्या शंका-प्रश्न गावपंचाकडून विचारली जातात.आणि मुलामुलीसह आईवडील वगैरे सर्वांची संमती घेतली जाते.आणि सर्वांच्या साक्षीने हे नाते जमले असे जाहीर केले जाते अथवा ठरवले जाते.यानंतर दोन्हीकडच्या पक्षाकडून पूर्वी सव्वा रुपये आत्ता अकरा -अकरा रुपये जमा केले जातात . आणि त्याची साखर अथवा दारू आणली जाते.आणि सर्व पंचाना दारू पाजली जाते म्हणजे सर्वांचे तोंड गोड केले जाते अर्थात पेन पिली जाते.अशाप्रकारे लग्न पक्के समजले जाते याला पेन पिणे असेही या समाजात म्हटले जाते.
यानंतर सर्वांच्या समक्ष साखरपुड्याची तारीख ठरवली जाते.अर्थात गावामध्ये एकाच दिवशी आणखी कोणाचा कार्यक्रम असू नये असा यामागिल उद्देश असतो.
३)नारळ टोपी :
४) साखरपुडा:
आदिवासी कोकणी कोकणा समाजात लग्नापूर्वी साखरपुडा (कुंकू)लावण्याची प्रथा आहे.साखरपुडा लावण्याची पद्धत हि इतरापेक्षा अगदी निराळीच असते.कुंकू लावण्यासाठी मुलाकडची मंडळी मुलीकडे येत असते.साधारणपणे छोटे लग्नच असे स्वरूप असते,म्हणजे जवळपास दोन्हीकडील भरपूर नातेवाईक या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात.या सर्वांची जेवनाची वगैरे सोय मुलीकडील मंडळीला करावयाची असते.पूर्वी साखरपुड्यात फक्त पुरुष मंडळी जात असे परंतु कालांतराने आता दोन्हीकडील लहानथोर, स्रीपुरुष उपस्थित असतात.
साखरपुड्यात मुलीसाठी मुलाकडील मंडळी साखरपुड्याचा विशिष्ट अशा पदार्थाने भरलेला ताट भरून आणतात.ज्यामध्ये मुलीचा संपूर्ण श्रुंगार,कपडे,५ प्रकारची फळे,साखरेचा पुडा गुळाने भरलेल्या वाट्या इत्यादी वस्तू असतात.त्याचप्रमाणे पान,सुपारी,शोप देखील आणली जाते.सर्वप्रथम गावच्याच नाईकडून गावाचे पाटील सरपंच मुखिया यांच्याकडून कुंकू लावण्यासाठी हुकुम मागितला जातो म्हणजे परवानगी घेतली जाते.त्यानंतर दोघांच्या मामांची देखील परवानगी घेतली जाते.मुलगी साज श्रुंगार करून मांडवामध्ये येते.आणि होणार्या सासरे वडीलधारी मंडळीला मानाचे पाणी देते,सासरे वागिरे देखील मुलीला रिकामा ग्लास परत न करता त्यामध्ये पैसे टाकत असतात.असा हा सर्व मानाचा कार्यक्रम झाल्यावर मग मुलगी पाटावर बसते आणि त्यानंतर मुलाकडील पाच स्रिया किवा पुरुष सर्वांच्या परवानगीने मुलीला साडी चोळी फळे इत्यादी वस्तू भेट देत कुंकू लावतात.यानंतर मुलामुलीचे आईवडील एकमेकांना मानाचा पानाचा विडा देतात आणि एकमेकांची भेट घेतात.यानंतर सर्वाना साखर आणि पानसुपारी वाटली जाते.अशाप्रकारे कोकणी कोकणा समाजात साखरपुडा(कुंकू)लावण्याची रीत आहे.यामध्ये त्या-त्या भागानुसार थोडाफार बदल असु शकतो.
लगीन
आदिवासी
कोकणी कोकणा समाजात समाजमान्य
विवाह पद्धती आहे.सर्व
समाज मान्य विधी केल्यानंतर
विवाहाससमाज व गाव्पान्चांची
मान्यता मिळाल्यावर आणि
साखरपुडा वगैरे विवाहपूर्व
विधी आटोपल्यावर लग्नाचा
मुहूर्त अथवा शुभ दिवस ठरवला
जातो.यामध्ये
बर्याच रूढी परंपरांचा समावेश
होतो.अर्थात
या सर्व विधीना एक दोन दिवस
आधीच सुरुवात केली जाते.
मुलाकडे
आणि मुलीकडे असे दोन्हीकडे
विविध रीतिरिवाजाप्रमाणे
विधी केल्या जातात.या
ठिकाणी या सर्व बाबींचा थोडक्यात
परिचय करून देत आहे.
१)
घट्या
देव (कुळदैवतांचे
पूजन)
आदिवासी
कोकणी कोकणी कोकणा कुकणा समजत
विवाहापूर्वी कुलदैवतांचे
लग्न लावण्याची प्रथा आहे.मागे
सांगितल्याप्रमाणे प्रत्येक
कुलाचे स्वतंत्र असे मंडळ
असते.हे
सर्व करीत असताना त्याठिकाणी
गावातील तसेच त्या कुळातील
सर्व नातेवाईक उपस्थित असतात.
सर्वप्रथम
मुलाच्या आईवडिलांच्या हस्ते
कुलदैवतांची दुध आणि शुद्ध
पाण्यात अंघोळ केली जाते.आणि
सर्व देवतांना एका धातूच्या
भांड्यात पायरीप्रमाने रांगेने
बसवले जाते.यामध्ये
खंडेरावदेव,बहिरमदेव,वाघदेव,नागदेव,मुंडादेव,बानुं,म्हाळसा,चंदनसूर्या,इत्यादी
देवदेवता असतात.या
सर्वांची मांडणी अत्यंत
काळजीपूर्वक केली जाते.एका
पाटावर देवांना ठेवल्यावर
त्यांच्या चारही बाजूस शुद्ध
पाण्याने भरलेले तांबे(पात्र)
ठेवले
जातात.
नंतर
या चारही तांब्यांना दोऱ्याने(हळद
लावून)
पाच
वेगवेगळ्या कुळातील व्यक्तीच्या
हस्ते गुंफले जाते दोरा गुंफत
असताना विशिष्ट अशा भगताकडून
मंत्र उचारला जातो.
“ ढवळा
घोडा पायम तोडा
कम्बरी
करदोडा ................”
देवाचं
लग्न लावण्याचा हुकुम........
यळकोट
यळकोट जय मल्हार चा घोष केला
जातो.
यानंतर
देवांच्या लग्नाची तयारी
केली जाते.देवांना
बाशिंग,
नवे
कापड,
नारळ,
सुपारी,
नागेल
पान वगैरे चढवले जाते.
सर्व
उपस्थित मंडळीला अक्षदा
वाटल्या जातात.आणि
गावातीलच एका जेष्ठ व्यक्तीकडून
मंगलाष्टक म्हटले जाते आणि
देवांचे लग्न लावले जाते.
रात्रभर जागरण गोंधळ घालणे किवा रात्रभर वह्या म्हणून काढणे
वहि ह्या प्रकारातील एक देवांचे
गौरव गीत पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
६)मोलटी :
७)मोह्तीर(पुनर्विवाह)