Ads Area

(Google Ads)

नाचणी



नाचणी का खावी – 

नाचणी पचायला हलकी असते. आजारातून उठलेल्या रुग्णांसाठी योग्य असते. नाचणी खाऊन पोटाच्या तक्रारी होत नाहीत. नाचणी पित्तशामक, थंड, रक्तदोष कमी करणारी आहे. नाचणी सत्व किंवा दुध साखर टाकून केलेली खीर लहान बाळ किंवा वयस्कर व्यक्तींसाठी उत्तम आहार आहे. भुकेची तीव्रता नियंत्रणात ठेवले जाते.
नाचणीला आदिवासी भागात नागली, रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकारानं मोहरीसारखे बारीक असतात. नाचणीमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर आहे.
1. नाचणी खावी कारण हाडांसाठी – सध्या आपण सर्वत्र ऐकतो ते म्हणजे हाडांच्या तक्रारी उदा गुडघे दुःखी, हाडांचा ठिसूळपणा जास्त प्रमाणात आढळुन येतो. हाडांचा अशक्तपणा, हाडं ठिसूळ होणं, हाडं खिळखिळी होणं हे आजार आजकाल दर दहा जणांपैकी एकामध्ये आढळतात. हाडांचे आजार असणाऱ्यांना आहारात “नाचणी’ शिवाय दुसरा पर्याय नाही.
2. नाचणी खावी कारण  वजनावर नियंत्रण  होणार फायदे – तांदळाच्या पदार्थाऐवजी नाचणीपासून बनलेले पदार्थ खावेत. नाचणी पचायला हलकी असते. नाचणीमुळे शरीराला फक्त ऊर्जाच मिळत नाही, तर अमिनो ऍसिड मिळते. वजनावर नियंत्रण  होणार तसेच भुकेची तीव्रता नियंत्रणात ठेवले जाते.
3. नाचणी खावी कारण  लहान मुलांसाठी गुणकारी -मुलांना गूळ आणि गाईच्या तुपापासून बनवलेला नाचणी हलवा घ्यावा. नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळे मुलांची पचनशक्ती सुधारते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad