मोहाचे (दारू नव्हे, फुलांचे!) हे औषधी गुणधर्म माहिती -
(शास्त्रीय नाव:Madhuca longifolia, मधुका लॉंगीफोलिया/लॉन्जीफोलिया)
नमस्कार मंडळी…आपल्या भारताने जगाला आयुर्वेद दिले असे आपण अभिमानाने सांगतो. भारतीय प्राचीन संस्कृती ,आरोग्य आणि वैद्यकीय दृष्टीने प्राचीन फळा-फुलांनी संपन्न अशी भूमी. आपण सर्व या भूमीचे महत्व आणि तिची महानता जाणतो.आपल्या प्राचीन वैद्यकशास्त्रातून आपल्याला अनेक औषधी वनस्पतींची माहिती मिळाली आणि त्याचं महत्व समजलं अशीच एक वनस्पती म्हणजे मोह किंवा महुआ. या झाडाला काही आदिवासी जमाती देव मानतात. या झाडाखाली त्यांचा देव मांडतात. बहुतेक आदिवासींचे सण/धार्मिक कार्यक्रम या झाडाच्या फुलांपासून बनविलेल्या दारूशिवाय (मोहाची दारू) पूर्ण होत नाहीत. पोलो हा सण साजरा करून फुले गोळा करण्याला सुरुवात करतात. (शास्त्रीय नाव:Madhuca longifolia, मधुका
लॉंगीफोलिया/लॉन्जीफोलिया) हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा
पानझडी वृक्ष आहे. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.खरं तर गंमतीने या वनस्पतीला ‘बदनाम’ वनस्पती देखील संबोधले जाते याचं कारण म्हणजे मोहापासून दारू बनवली जाते. मोहापासून दारू बनवली जाते पण त्याचे महत्व हे दारुपुरता अजिबातचं मर्यादित नाहीये. मोह हे औषधी वनस्पतींमध्ये अत्यंत अग्रस्थानी मानले जाते. चला तर मग या औषधी वनस्पतीचे विविध गुणधर्म जाणून घेऊयात…
मोहाची फुलं ज्याप्रकारे अनेक उपचारांसाठी वापरली जातात त्याप्रमाणे खोकला, ब्रॉँकायटिस आणि इतर पोटाचे तसेच श्वसनचे विकार यासाठीही त्याचा वापर होतो.
मधुमेह आणि मोह
हल्लीच्या जगात मधुमेहाची समस्या सामान्य झाली आहे. मथुमेह असलेल्या लोकांसाठी मोह औषधासारखे आहे. मोहाच्या झाडाच्या सालीपासून बनविलेली
डिकोक्शन मधुमेह असलेली ट्रीटमेंट रुग्णांना फायदेशीर ठरते. त्याचे औषधी गुणधर्म शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. मधुमेहाची लक्षणे त्याच्या सालातून बनविलेल्या डीकोक्शनच्या नियमित सेवनद्धारे दूर करता येतात.
संधिवात उपचारात मदत
मोहाची साल टॉन्सिल्लिसिस, मधुमेह, अल्सर आणि संधिवातासाठी वापरली जाते. यासाठी महआच्या झाडाची साल एक डेकोक्शन बनून घरच्या घरी आणि नियमितपणे आपण घेऊ शकतो.
मोहाची साल बारीक करून गरम करून घेऊन लावली तर संधिवातदुखीचा त्रास आणि सूज कमी होण्यास मदत होते. एवढंच नाही तर मोहाच्याबियाण्यांमधून काढलेल्या तेलाने मालिश करूनदेखील उपचार करण्यास मदत होते.
आपण दाताच्या समस्यांसाठीसुद्धा मोह वापरू शकतो. दातदुखीसाठी मोहाचे कोंब आणि साल फायदेशीर ठरतात. जर आपल्याला दातदुखी आणि हिरड्यांतून रक्तस्त्राव होत असेल तर मोहाच्या सालातून निघणाऱ्या रसामध्ये थोडे पाणी मिसळून त्याने दात घासल्यास फरक पडू शकतो. या व्यतिरिक्त आपण मोहाच्या झाडाच्या डहाळ्यांनी ब्रश देखील करू शकतो.त्यामुळे तोंडातील जीवाणू नष्ट होऊन दातदुखीपासून मुक्तता मिळते.
मूळव्याध आणि डोळ्यांच्या आजारासाठी..*
मूळव्याधीध्येही मोहाचे फुले फायदेशीर असतात. ती फुले जर आपण तुपात भाजून घेऊन रुग्णाला नियमित खायला दिले तर फायदेशीर ठरतात,यामुळे वेदना कमी होते आणि रुग्णालादेखील आराम मिळतो.
याशिवाय त्या फुूलांचे मध डोळ्यांमध्ये लावल्याने आपले डोळे शुद्ध होतात आणि डोळे चमकतात, या व्यतिरिक्त, त्यातून बनविलेले मध डोळ्यांतून पाणी येणे आणि खाज सुटण्यावर उपचार म्हणून देखील उपयुक्त आहेत.
त्वचा रोगासाठी उपयुक्त…मोह
मोहाचा उपयोग केवळ त्वचा मऊ करण्यासाठीच होत नाही, तर त्वचा रोगांवर उपचार म्हणून देखील होतो. यासाठी मोहाच्या पानांना तिळाचे तेल लावून गरम करून त्वचेवर लावल्याने फरक पडतो.
आपल्या त्वचेच्या खाज सुटणे आणि पुरळ उठणे असा विकार असलेल्या भागावर मोहाची गरम पाने लावल्याने या पानांचा परिणाम म्हणजे त्वचा रोग बाधित भाग कमी होण्यास फायदा होतो. याशिवाय मोहाच्या फुलांच्या सेवनाने महिलांमध्ये त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत होते.
ज्याप्रमाणे नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा वापर होऊन तो उपयोगात येतो अगदी त्याचप्रमाणे मोहाच्या झाडाचादेखील प्रत्येक भागाचा उपयोग होतो त्यामुळे त्याला ‘औषधी कल्पवृक्ष’ संबोधले तर वावगं ठरणार नाही.
मोहाची फुले पहाटे गोळा करतात आणि ती वाळवून,साठवून ठेवतात. रोख पैशांची गरज असेल तेव्हा बाजारात विकतात. मोहाच्या फळामध्ये असणाऱ्या बीजाला टोळी असे म्हणतात.
या बीपासून तेल काढले जाते. पूर्वीच्या काळी खाण्यासाठी मध्य भारतातील आदिवासी हेच तेल वापरत असत. अजूनही या भागातील गरीब लोक हे तेल वापरतात. फुले व फळे मार्च ते मे या कालावधीत मिळतात.या झाडाची मुळे व फ़ांद्या इंधन म्हणून वापरतात.
मोहाचे लाकूड मोठे असते,पण जास्त काळ टिकत नाही. मोहफुले मार्च महिन्यात येतात. देवा-धर्मात,औषधात मोहफुलांचा फार उपयोग होतो. या फुलांपासून दारू काढतात.
टोळ म्हणजे मोहाच्या झाडाचे फळ आहे. या टोळीचे तेल काढतात. दिवा लावायला व खाण्यासाठी हे तेल वापरतात. पण टोळीचे तेल गरम खाल्ले तर चांगले असते. थंड झाल्यास त्याचा खवट वास येतो.
टोळीच्या आतल्या बियांपासून साबण बनवतात. टोळीचा जेवणात बराच उपयोग होतो. मोहाचे फुल पौष्टिक आहे म्हणून ते गरोदर बाईला किंवा आजारी माणसालाही खायला देतात.
मंडळी…वनोत्पादनामध्ये मोह अत्यंत महत्त्वाचा वृक्ष असून, तो औषधी आणि व्यावसायिक उपयोगासाठी प्रसिद्ध आहे. त्याला हिंदी व इंग्रजीमध्ये महुआ या नावाने ओळखले जाते. मोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे त्यांचा टिकवण कालावधीही अत्यंत कमी आहे. त्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता, मोहाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संधी आहेत.
मोहाचे महत्व मोहाच्या झाडाला राजश्रय - राज्य झाड होण्याची गरज
माहिती संग्रहित आहे.

