Ads Area

(Google Ads)

आदिवासी म्हणजे या देशाचा 'मूळ रहिवासी '.निसर्ग हाच आदिवासी धर्म .

          *डोंगऱ्यादेव* 
आदिवासी म्हणजे या देशाचा 'मूळ रहिवासी '.निसर्ग हाच आदिवासी धर्म . निसर्ग आणि नैसर्गिक साधनसंपत्ती आदिमानवाला मिळालेली एक  देणगी आहे .आदिवासी ज्या शक्तीची पूजा करतात ,ती म्हणजे 'पंचतत्व ' निसर्गाचे आधार आहे .ही पंचतत्त्वे म्हणजेच पृथ्वी , आप, तेज , वायु आणि आकाश . म्हणजेच "आप " .
        आदिवासींच्या धार्मिक परंपरा निसर्ग आणि निसर्गातील शाश्वत गोष्टींनी निर्माण झालेली आहे .निसर्गात घडणाऱ्या अनाकलनीय गुढ घटनांना त्यांनी एक तर देवाचे नाव दिले आहे , अज्ञात शक्ती म्हणून तिची पूजाही केली आहे त्यातूनच आदिवासींची दैवत कल्पना व भूतबाधा श्रद्धा , अंधश्रद्धा या गोष्टी उदयास आल्यात .आदिवासी वास्तवाचा पूजक आहे हे वास्तव त्याच्या डोळ्यांना दिसणारे आहे जसे सूर्य ,चंद्र ,आकाश , धरती, अग्नि, पाणी प्राणी ,पशुपक्षी , वृक्ष , नदी-नाले ही सर्व त्याला देवतास्वरूप आहेत आणि याच देवतांचे पूजन फार पूर्वीपासून तो करीत आला आहे .आदिवासींचे देव तरी कोणते 'घरातले देव' , ' गावातले देव , 'रानातले देव ' यांची मनोभावे पूजा तो करतो .आदिवासी जाती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची संस्कृती त्यांचे लोकजीवनाचे तंत्र ,तत्व ही एकच आहे आदिवासी हा निसर्गालाच देव मानत आला आहे .निसर्ग हा काय अवतार घेऊन आलेला पुरुष नव्हे तर जो आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू देऊ करतो व आपल्याला जगवतो त्याच्याबद्दल आस्था आणि श्रद्धा असणे .
        आदिवासींच्या एकूण पंचेचाळीस जमाती या ४५ जमातीतील कोकणा , भिल्ल , महादेव कोळी , मावची , पावरा ,बांधव निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सोहळा म्हणून डोंगऱ्या देवाचा उत्सव साजरा करतात . डोंगऱ्या देव उत्सव हा डोंगरांमधून आपल्याला अन्न मिळते पशुपक्ष्यांना निवारा मिळतो ,पिण्यासाठी पाणी मिळते शेतीसाठी जमीन मिळते , त्या निसर्गातील प्रतिनिधी म्हणून डोंगर देवाचे पूजन करतात .आदिवासी साठी खरे तर हा कृतज्ञता सोहळाच आहे.  डोंगऱ्या देव हे कोकणाचे कुलदैवत आहे. कोकणा , कोकणी ,कुंकणा शब्द वेगवेगळे परंतु एकाच जातीसाठी वापरले गेलेले शब्द . कोकणांची कोणतीही उपजात नाही . कोकणा हा उत्सव कसा साजरा करतात याबाबत घेतलेला एक "धांडोळा"
        डोंगऱ्या देव हा उत्सव कोकणा वर्षातून तीन वेळा साजरा करतात . प्रामुख्याने डोंगऱ्या देव हे कार्तिकी पोर्णिमा म्हणजेच मोठी दिवाळी व मार्गशीर्ष महिन्यातील महिन्यातील नान्ह ( लहान ) दिवाळी  व पौष मासारंभात नडगी पूनव ( पौर्णिमा) या तीन पौर्णिमेला साजरी करतात . चंद्रदर्शन म्हणजेच चंद्राची कोर ( त्याला नवा दिसणे)दिसली की त्यावेळेस डोंगऱ्यादेव बसतात .
         डोंगऱ्यादेव बसवितांना ह्या उत्सवाची नियमावली व पुजाविधीची पद्धती आहे. त्याप्रमाणेच हा विधी पार पाडणे आवश्यक असते . डोंगऱ्यादेव हे हौशीचे ' नवसाचे आणि गावचे असे मिळून बसविले जातात . कोणी नवस घेतला असेल ते नवसाचे , कोणी हौस म्हणून बसविता ते हौशीचे तर कोणी गाव मिळून एकत्र येऊन बसवितात . डोंगऱ्यादेव बसविण्या मागे संकल्पना हेतु हाच की,  समृद्धी , वंशवृद्धी , आरोग्य , शेतीबाडी , पाळीव प्राणी या सर्वांना सुखशांती लाभावी ' वाईट शक्ती , नैसर्गिक आपत्ती रोगराई या सर्वांपासून संरक्षण मिळावे . डोंगऱ्यादेव धरत असतांना खाली उल्लेखिलेल्या क्रमवार टप्याने 'उत्सवाची सुरुवात होते .
 १ ) *परवानगी* -कुंटुबीय , गावचा पाटील , सरपंच , वडिलधारी गाव मंडळी , या सर्वांची संयुक्त परवानगी घेतली जाते .
 २ ) *नियोजन* -पुजनाची तारीख वेळ व इतर महत्वाचे नियोजन होते
 3 ) *निमंत्रण* -पुजाविधी पार पाडण्यासाठी जे व्यक्ती आवश्यक आहेत त्यात. शेवऱ्या मावली (भगत ) ' भोपा माऊली ' पावरकर ( डवऱ्या मावली ) ' कथकरी (गोठारी ) या सर्वांना सव्वा रुपया व सुपारी देऊ करून कार्यक्रमाला आंमत्रित केले जाते. व विधिवत कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी सोपविली जाते .
  ४ ) *गावदवंडी* -गावदवंडी दिली जाते अमक्या अमक्या कडे देव आहेत . गावातील प्रत्येक घरातील इच्छा असेल त्या व्यक्ती मावल्या होण्याची तयारी करतात . 
 ५ ) *पूर्वतयारी* -घरदार अंगण .साफसफाई करून अंगणात देवखळी शेणाने सारवून तयार केली जाते .
   ६ ) *थोंब स्थापना*-(गड पुजन ) - शेवऱ्या ( मुधानी , भगत ) व पावरकर हे विधिवत थोंब स्थापना करतात थोंब - तुळशी , झेंडुचे झाड , वेळूची काठी ,ऊस , देवअंबाडी ' देवकरडू इ० . दरवाज्याच्या समोर देवखळी त मध्यभागी स्थापना करतात . त्या खळीतच मावल्या गोलाकार उत्सवा दरम्यान नृत्य करतात
   ७ ) *कथाकथन*- कथकरी (गोठारी ) व झिलकऱ्या ही दोघ व्यक्ती कास्याची थाळी व भांगसर यांच्या संगीताच्या नादात  कणसरी , उन्ह्याबाळ , झांजु गवळी इंगळ्या प्रधान यांच्या गोष्टी सांगतात . जो गड धरला असेल त्या दिशेला तोंड करून बसून कथा सांगितली जाते
   ८ ) *रात्र जागरण* - विविध दैनंदिन जीवनातील सोंग काढली जातात . नंदीनृत्य ,देवांगण्या  , भवानी , चाष्ट्या ,गवत्या , मोरांगी अशी पारंपारिक सोंग नाचविली जातात . आताशी नव्याने रामायणातील पात्रांची सोंग काढली जातात फक्त मनोरंजन म्हणून पूर्वी ही सोंग काढली जात नव्हती.
  ९ ) *गाव मागणे* - भंडारा करण्यासाठी दाळ  , मीठ, मिरची तेल अश्या स्वरूपात जमा केले जाते. ज्या ज्या घराच्या मावल्या बनल्यात त्या घरी पण जातात . व आशिर्वाद देतात
  १३)' *गडावर प्रस्थान* -जो गड धरला असेल त्या गडावर जाण्यासाठी मावल्या कंबर बांधून सज्ज होतात . कमरेला एक टॉवेल त्यात नारळ , दाळ्या , मुरमुरे असतात
 ११ ) *खड्या पुड्या पुजन* - रस्त्यात नदीकाठी मावल्या थांबून आंघोळ करतात .अख्ये तांदुळ व सुटे पैसे १ /२ रुपये यांनी पूजन करणे
 १२ ) *चौकी पूजन* - रस्त्यात येणारे चांगल्या / वाईट शक्तीच्या ठाण्याची पुजा करणे . वाघदेव नागदेव ' इ०
१३) *रानखळी* -रानखळी वर आगमन व पलंगा टाकणे - पावरीच्या आवाजात शेवऱ्या मावलीच्या मंत्रोच्चारात तांदळाची पुंज टाकून पूजा करणे
 १ ४ ) *दिवा लावणे* - रात्रभर दिवा लावून ठेवणे
 १५) *उपवास सोडणे* - खिचडी बनवून उपवास सोडतात
  १६ ) *गड ठोकणे* - कंबरेला बांधलेले नारळ सोडून ते गडाच्या कपारीला ठोकणे व दाळ्या मुरमुरे वहावून पुजन करणे
  १७) *गडावरून परत*-घरधनी माऊली च्या घरी खळीवर परत येणे
 १८) *धानी पूजन* - गावाच्या धानीवर सारवूण पुजाविधी करून कोंबडा / बोकड नमविणे
  १९) *भंडारा जेवण* - मांसाहारी जेवण बोकडाचे मांस , भात व भाकरी , न खाणाऱ्यांना शाकाहारी जेवण बनविले जाते
२०) ) *कार्यक्रमाचा समारोप* - शेवऱ्या मावली मंत्रोच्यार करून बरकत मागून विधिवत पूजा करून समाप्ती करतो
२१ *सालवा बांधणे*- पाहुणे मंडळी मावल्यांना नविन दोरा टॉवेल /टोप्या आणतात ते देतात त्या दिवसापासून मावल्या बंधनातून नियमातून मुक्त होतात व आपले दैंनदिन कामाला लागतात .
   अशा पद्धतीन अतिशय खडतर व कडक नियमाच्या पालनात हे व्रत करावे लागते . मावल्या पुरुष , तरुण व बालक जे बनतात त्यांच्यासाठी नेप (नियमावली ) असते. त्यांचे व्रत असे पर्यंत त्यांना सर्व नाते न लावता काका ,बाबा ' मामा न म्हणता फक्त मावली म्हटले जाते , उपवास करावा लागतो , ठरविक खाण्याच्या वस्तुचा त्याग करावा लागतो , चप्पल घालणे वर्ज्य , मासांहर वर्ज्य ,ब्रम्ह्चारी व्रतांचे पालन , देवखळीवर मुक्काम करावा लागतो. . आणि ह्या सर्वांमध्ये उत्साह जोश निर्माण करण्याचे काम हे ' शेवऱ्या पावरकर ' चिरक्या टापरा हे करीत असतात . गावमंडळी आतस्वकीय मनोभावे या कार्यक्रमाला उपस्थितीत राहतात . घरातील स्त्रियां पूर्ण दिवस त्यांच्या ठराविक वेळेनुसार आरतीचे ताट घेऊन आरत्या करतात . डोंगऱ्या देवाच्या आळवणी करतांना म्हटल्या जाणाऱ्या गद्यात्मक पदात्मक ओळींना वळत्या ( वह्या ) म्हटले जाते ' या वळत्या मध्ये चार खंड , चार समुद्र , कणसरी माता चंद्र सुर्य धरती, महादेव , सहादेव ,बहिरम देव ' मुंजुदेव ' वाघदेव , नागदेव  व देवीच्या नावाबरोबरच डोंगऱ्यादेवाचे वास्तव्य असणाऱ्या गडांचे नाव घेतले जातात . व शेवटी ज्या गडाचे पूजन करायचे त्या गडाचे नाव घेतले जाते .
   या पूजनात सात शेवरी / देवांगण्या ही सकंल्पना खूपच वैशिष्टयपूर्ण आहे. . आता या सात शेवरी मध्ये वाढ होत आहे परंतु मुख्य शेवरी ह्या सातच आहेत. धान्य पेरणीपासून ते कणगीत येईपर्यंत पीक ज्या अवस्थेतून जाते त्यानुसार त्यांना नाव देण्यात आली आहे. कणसरा (नागली ) ही तर खरे आदिवासींची अन्नदेवता . हे पीक फक्त आदिवासी भागातच पहायला मिळेल . हे एकमेव धान्य आहे की ज्याला किड लागत नाही वर्षोनुवर्ष ते कणगीत भरून जतन करून ठेवता येते. . कणसरी व डोंगऱ्यादेवाची शपथ ही एखादया गोष्टींची सत्यता म्हणून घेतली जाते. न्यायलयातही आदिवासी व्यक्तींनी ही शपथ देण्यात येते. नागली खळ्यात रास करून ठेवून तिची पुजाविधी केली जाते , नागलीच्या खळ्यात चप्पल घालून जाण्यासाठी वर्ज्य असते . तर या सात शेवरी खालील प्रमाणे
   १) *काळीशेवर* - धरतीमाता
   २ ) *निळाशेवर* - कोंब फुटणे / अंकुर येऊन शेत हिरवे होणे
   ३ ) *फुलाशेवर* - पिकांना फुल येणे
   ४ ) *गोंडाशेवर* - कणीस लागणे
   ५ ) *दुधाशेवर* - कणीसात दूध भरणे , पक्व होण्या पूर्वीची प्रक्रिया
   ६ ) *झेलाशेवर* - धान्य परिपक्व कणीस होऊन ते टोपलीत भरणे
   ७ ) *रास शेवर* - धान्य मळणी करून रास करून ती आता ती कणगीत भरण्यास तयार असणे
   अश्या रीतीने आदिवासींचे सण समारंभ हे  निसर्गाच्या तत्वांच्या जवळ नेणारे आहे. . देवांगण्या हा डोंगऱ्या देवाचा महत्वपूर्ण देवता आहेत. . डोंगऱ्यादेव म्हणजे कोणती देवता याबाबतही अनेक मतेमतांतरे आहेत . जसे कथेत डोंगऱ्यादेव म्हणजे कार्तिके स्वामी असे म्हटले आहे. कार्तिके स्वामी भगवान महादेवांचा जेष्ठ पुत्र . महादेव हा आदिवासी चा बडादेव ( मोठादेव ) म्हणून पुनाविधीत तसेच जीवनात आहेच . परंतु बालाभाऊ गवळी नागझिरीकर आदिवासी संस्कृती जाणकार व अभ्यासक मुलाखतीत .म्हणतात ' की डोंगऱ्यादेव म्हणजे फक्त डोंगऱ्यादेव जो मुर्ती स्वरूपात नाही . तो फक्त कपारी स्वरूपात पुजला जातो. तो मुर्तिस्वरूपात नाही . डोंगर अशी निसर्ग संपदा आहे जी मानवाच्या मूलभूत गरजा भागविते जसे. सर्वच नद्याचा उगम हा डोंगरातून होतो ' पिण्यासाठीचे पाणी हे डोंगरातून मिळते . पूर्वी निवाऱ्या साठी तो कपारीचा ' , गुफेचा आश्रय घेत होता . आणि आताही डोंगरदऱ्यातच आदिवासी वास्तव्य करून आहे.आदिवासींची अन्नदेवता कणसरी (नागली ) व इतर खाण्याउपयोगी वनस्पती डोंगरानेचे दिल्यात . पशुपक्षी व मानवाला मिळालेले हे जीवन डोंगरामुळे आहे , म्हणून तो डोंगरदेव " अशी संकल्पना ते मांडतात
      वरील युक्तीवाद हा पटण्या सारखा आहे. परंतु त्याच बरोबर लोकवाङ्ममयात डोंगऱ्यदेवा बदलच्या मान्यतानाही स्विकाराव्या लागणारच शेवटी एकच की '
      आदिवासी हा निसर्गवाद , वास्तववादाचा पुरस्कर्ता आहे *निसर्ग हीच त्याची देवता . आणि जीवनदाता* " . त्यांच्या जगण्याला एक आधार व पितृत्वाचे दातृत्व करणारा व आदिवासीचे जीवन सुकर करून ह्या धरातला चा मुळमालक *मुळरहिवाशी* ' आदिवासी हा भारतीय संस्कृती व प्रकृती टिकवून ठेवण्यासाठीचा मोठा ' दुवा ' आहे कुलदैवत डोंगऱ्यादेव *GOD.OF MOUNTAIN*" हे त्यांचा पालनकर्ता आहे . आणि आदिवासी त्याची लेकरं .!!!!!

 *लेखिका* -
*श्रीमती . डॉ.प्रतिभा देशमुख चौरे*
( एम.ए डी.एड् , बीएड़ , एमएड् , डी. एस.एम , सेट (शिक्षणशास्त्र ) , एम.एस .डब्ल्यु ,पीएचडी संशोधनार्थी )
प.प्रा शिक्षिका ' कै हरिभाऊ चौरे अनु आश्रमशाळा पिंपळनेर ग्रा.पं सदस्या पिंपळनेर )
(डोंगऱ्यादेव पुजन कार्यक्रम, मा. कृष्णाशेठ गायकवाड (तलावपाडा) व श्री इंजि . किरण कृष्णा गायकवाड / सौ इंजि .प्राजक्ता किरण गायकवाड ( मोठ्या बहिणीचे जावाई व मुलगी )

         .*"GOD OF MOUNTAIN** "

लेखिका -

डॉ. प्रतिभा रामदास देशमुख
(सामाजिक कार्यकर्ती )
( एम ए डिएड , बीएड् ' एमएड्, डीएसएम , सेट (शिक्षणशास्त्र ) , डीएस एम , एमएसडब्ल्यु , पीएडी)

         .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad