वडपाडा नवापाडा ता.साक्री येथील खळीमधील वळीत नाचगाण्यासह पहा
क्लिक करा
झी मराठी या मराठी वाहिनीवर झळकलेल्या कोकणी डोंगर्यादेव उत्सवाचे प्रक्षेपण पहा
क्लिक करा
आदिवासी कोकणी कोकणा समाजात वही या गाण्याचा विशेषकरून प्रत्येक कार्यक्रमात जागरण करण्यासाठी केला जातो. अत्यंत सुंदर तालासुरात संपूर्ण रात्र देवांच्या नावाची गाणी (वही)म्हणून रात्र जागरण केली जाते.
यामध्ये सर्व देवदेवतांच्या स्तुतीची गाणी गायिली जातात. प्रत्येक प्रसंगावर आधारित अशी गाणी असतात हि गाणी कुठेही कोणीही लिहलेली नाहीत हे विशेष.
पिढ्यानपिढ्या तोंडपाठ होत आलेली या प्रत्येक गाण्याला म्हणजेच वाहिला वेगवेगळी चाल लावली जाते. सोबत ढाक या वाद्याची साथ असते. ढाक हे वाद्य फक्त आणि फक्त याच समाजात पाहण्यास मिळते इतरत्र कुठेही हे वाद्य आढळून येत नाही