Pavitra Portal Shikshak Bharti 2024
पवित्र पोर्टल वर बहूप्रतिक्षीत जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत.
राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार, अखेर मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ आणि मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२’ ऑनलाइन पद्धतीने घेतली होती.
या चाचणीसाठी एकूण दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. या चाचणीमधील गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीसाठी शिक्षण सेवक, शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यम, बिंदुनामावली, विविध शिक्षक प्रवर्ग या सर्व विषयांचा एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या. सोशल मिडियावर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. परंतु अशा कोणत्याही दबाव, खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय आणि शासनाचे विविध विषयावरील धोरणाचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षक भरतीच्या एकूण जागा जाहीर झाल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी जवळपास सात हजारांहून अधिक उमेदवारांनी प्राधान्यक्रम देखील दिला आहे.
शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी २०२२ चे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या चाचणीसाठी एकूण २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवार प्रविष्ट झाले. जून ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदुनामावलीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिंदुनामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यामुळे जिल्हा परिषदेच्या १०टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदांमध्ये सध्या ७० टक्के रिक्त जागांवर पदभरती करण्यात येत आहे. प्रचलित शासन निर्णयाचे पालन करूनच ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
"शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीच्या कार्यवाहीला मुहूर्त लागला असून शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून देण्यास सोमवार (ता.२९) पासून प्रारंभ झाला असला तरी, प्रात्याक्षिक पवित्र पोर्टल सुरूच झालेले नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. यातच, शासकीय शाळांची जाहिरात प्रसिद्ध नसल्याने संभ्रमावस्था आहे. त्यामुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गत अनेक वर्षांपासून प्रलंबित शिक्षक भरतीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यात १५ हजार शिक्षकांची भरती प्रक्रीया राबविणार असल्याचे जाहीर केले आहे."
पवित्र पोर्टलवर ज्या ‘TET’ उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. त्याची सुरवात सोमवारी झाली. जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी ३० जानेवारीची मुदत देण्यात आलेली आहे. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर संबंधित जाहिरात प्रसिद्ध होईल. ही मुदत मंगळवारी संपुष्टात येत असून ज्या शाळांची बिंदूनामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतलेली नाही आणि २०२२-२३ मधील संच मान्यता अपूर्ण आहे, त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करता येणार नाही. उर्वरित शाळांना आता शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात संधी दिली जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना प्रसिध्द केल्या आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज संस्था तसेच खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा १५ जानेवारीपर्यंत दिली होती. त्यानंतर जाहिरातीत जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश व्हावा यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली. वेळेत नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया २४ पर्यंत पूर्ण झाली. या सर्व जाहिराती एकत्रित पाहण्याची सुविधा २९ जानेवारीपर्यंत देण्यात येईल. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना त्यानंतर प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहे.
राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरू करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे बहुप्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरतीसाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मध्ये घेतली होती. सदर चाचणीसाठी नोंदणी केलेल्या दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांपैकी तब्बल दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे. तर आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५६२ उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठीची स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती रिसोड तालुक्यातील शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवाराने दिली आहे.
राज्यात एकूण १५६ व्यवस्थापनांकडून तब्बल सात हजार ७२० शिक्षकांच्या पदांची जाहिरात शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर दिली आहे. या शिक्षक पदांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असणाऱ्या आणि पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. बहुप्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षक भरतीतील किमान काही जागांची जाहिरात निघाल्याने शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी पवित्र प्रणालीमध्ये वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेल्या उमेदवारांना जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. संबंधित पात्र उमेदवारांना पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकविण्यासाठी नियुक्त केंद्र शालास्तरावर एक शिक्षक याप्रमाणे इंग्रजीतून शिक्षण झालेल्या उमेदवारांमधून हे पद भरण्यात येणार आहे. परंतु, त्याला मराठी माध्यमाच्या उमेदवारांकडून विरोध दर्शविला जात आहे.
राज्यातील १४ जिल्हा परिषदा, १५ नगरपालिका आणि दोन महानगरपालिका यांच्यासह १२५ खासगी व्यवस्थापन अशा एकूण १५६ व्यवस्थापनाकडून सात हजार ७२० शिक्षकपदाची जाहिरात देण्यात आली आहे. या व्यवस्थापनांकडून पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. यात मराठी माध्यमाच्या शाळांसाठी सहा हजार ८४५ शिक्षकांच्या पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. माध्यमनिहाय बिंदूनामावली असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी स्वतंत्र जाहिराती असतात.
– सूरज मांढरे, राज्याचे शिक्षण आयुक्त
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात शिक्षक भरतीसंदर्भात बिंदुनामावलीतील दुरुस्तीबाबत आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यासंदर्भात कारवाई करणे आवश्यक आहे. आता पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना ८० टक्केऐवजी ७० टक्के रिक्त पदांची मागणी करावी, अशी नव्याने सूचना १९ डिसेंबर रोजी शिक्षण आयुक्तांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
यापूर्वीच अनेक महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीमध्ये आता पुन्हा १० टक्के जागा कमी भरल्या जाणार आहेत. या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. जून २०२३ मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार शिक्षकांच्या रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास दिलेल्या परवानगीनुसार सर्व पदे भरायची आहेत. मात्र, बिंदुनामावलीसंदर्भात काही वैध, आक्षेप किंवा तक्रारी प्राप्त असल्यास त्यांचे निराकरण केले जाईल. शासनाच्या परवानगीनुसार उर्वरित १० टक्के रिक्त पदे भरतीची कारवाई करण्यात यावी, असेही आयुक्तांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बिंदुनामावली लवकरात लवकर पूर्ण करून संवर्ग व प्रवर्ग यादी जाहीर करावी. रिक्त जागांसंदर्भातही माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे